ETV Bharat / state

बुलडाण्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची वाढ; संख्या पोहोचली 36 वर - कोरोनाबाधितांची संख्या 36 वर

बुलडाणा जिल्ह्यातील चांदुर बिस्वाचा येथील युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वृद्धाच्या संपर्कात आला होता.

buldana corona update
बुलडाणा कोरोना अपडेट
author img

By

Published : May 22, 2020, 7:46 AM IST

बुलडाणा- जिल्ह्यात गुरुवारी रात्री एका २१ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित युवक हा नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा या गावाचा असून तो जळगांव जामोद येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वृद्धाच्या संपर्कात आला होता. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36 झाली आहे.

पाच दिवसांपूर्वी जळगांव जामोद येथील एक वृद्ध व्यक्ती खामगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू पावला होती. ती मृत्यू नंतर कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. वृद्धाच्या संपर्कातील नागरिकांना तत्काळ क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

गुरुवारी चांदुर बिस्वा येथे २१ वर्षीय युवक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. हा युवक कोरोनाबाधित वृद्धासोबत प्रवास करीत गावी पोहोचला होता. पुण्यावरून आलेला हा वृद्ध अकोला येथे पोहोचल्यावर त्याच्या सोबत चांदुर बिस्वाचा हा युवक सोबत होता.एकाच क्रूझर गाडीतून दोघांनी प्रवास केल्याचा या युवकाचा प्रवास इतिहास आहे. त्यामुळे तो देखील कोरोनाबाधित झाला.

त्यायुवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चांदुर बिस्वा गावाला सील करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात एकूण ३६ कोरोनाबाधित रुग्ण झाले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर २४ कोरोनामुक्त झाले आहेत तर कोव्हिड रुग्णालयात ९ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.