बुलडाणा - बुलडाण्यातील ४५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 4 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. तर, यातीलच एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने खबरदारी म्हणून बुलडाणा नगर परिषदेचे आरोग्य सभापती आशिष जाधव आणि आशिष जाधव यांच्या संपर्कात आल्याने मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना 14 दिवसासाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. होम क्वारंटाईन असतानाही आरोग्य सभापती आशिष जाधव आणि मुख्यधिकारी महेश वाघमोडे घरून शहराच्या साफ-सफाई व निर्जंतुकीकरणवर लक्ष ठेवून आहेत.
बुलडाण्यात 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये 4 जणांचा रिपोर्ट हा पोझिटिव्ह आला होता. यातील चौथ्या रुग्णाचा अहवाल हा 2 एप्रिल रोजी आला होता. दरम्यना, या रुग्णाच्या संपर्कात बुलडाणा नगर परिषदेचे आरोग्य सभापती आशिष जाधव हे आल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, आशिष जाधव यांच्या संपर्कात मुख्याधिकारी महेश वाघमोडे आल्याने त्यांनाही 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.