ETV Bharat / state

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला: शहीद अधिकाऱ्यांना बुलडाणा पोलिसांकडून आदरांजली - पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे न्यूज

शहर पोलिसांनी 26/11 हल्ल्यातील शहीद झालेल्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली. नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये संविधानाचे वाचनही करण्यात आले.

शहिदांना आदरांजली
शहिदांना आदरांजली
author img

By

Published : Nov 26, 2020, 8:37 PM IST

Updated : Nov 26, 2020, 10:10 PM IST

बुलडाणा - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना शहर पोलीस स्टेशनमध्ये पवित्र आदरांजली वाहण्यात आली. तसेच संविधान दिनही साजरा करण्यात आला.

शहर पोलिसांनी 26/11 हल्ल्यातील शहीद झालेल्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली. देशाने संविधानाचा स्वीकार करून 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये संविधानाचे वाचनही करण्यात आले. यावेळी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमीत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक विनायक रामोड,अमोल शेजोळ, दिलीप पवार, गजानन लहासे, सुनिल दळवी, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर महाजन, निर्मला कंकाळ, नंदा सुरडकर व महादेव इंगळे उपस्थित होते.

शहीद अधिकाऱ्यांना बुलडाणा पोलिसांकडून आदरांजली

पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे म्हणाले, की देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात वरिष्ठ अधिकारी विजय साळसकर, अशोक कामटे व इतर अधिकारी व कर्मचारी शहीद झाले. त्यांचे पुण्यस्मरण करण्यात आले. तसेच संविधान दिनही साजरा करण्यात आला आहे.

Last Updated : Nov 26, 2020, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.