ETV Bharat / state

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर, 51 जणांनी केले रक्तदान

author img

By

Published : Apr 17, 2021, 3:26 PM IST

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासोबतच राज्यात आता रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या आवाहनानुसार मोताळा येथे शुक्रवारी १६ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर

बुलडाणा - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासोबतच राज्यात आता रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या आवाहनानुसार मोताळा येथे शुक्रवारी १६ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. ॲड. शर्वरी तुपकर यांनी रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले.

रविकांत तुपकर सध्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. परंतु त्यांच्या पश्चातही स्वाभिमानीची टीम जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोताळा तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी केले.

51 जणांनी केले रक्तदान

कोरोनाच्या या संकटकाळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

हेही वाचा - ईटीव्ही इम्पॅक्ट: अनावश्यक लोकल प्रवास करणार्‍यांवर कारवाई; रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.