ETV Bharat / state

बुलडाणा नगरपरिषदेवर विशेष सभेला तहकूब करण्याची नामुष्की - sepcial

सद्यस्थितीत विशेष सभेमधील तीनही विषय महत्त्वाचे आहेत. शहरातील पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा तसेच शहरात पसरलेले घाणीचे साम्राज्य. असे असताना नगर परिषेदेचे कर्मचारी इतके बेजबाबदारपणे वागतात की त्यांच्याअभावी सभा तहकूब येण्याची नामुष्की नगर परिषेदेवर येत आहे.  उपमुख्याधिकारी म्हणाले की, विशेष सभा ही अध्यक्षांनी बोलावली आहे.

विशेष सभेला तहकूब करण्याची नामुष्की
author img

By

Published : Jun 11, 2019, 7:32 PM IST

बुलडाणा - शहरातील महत्त्वाच्या मुद्यावर नगराध्यक्षांनी आज ११ जूनला बोलावलेल्या विशेष सभेला खाते प्रमुखांच्या अुनपस्थितीमुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की बुलडाणा नगर परिषदेवर ओढवली. नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नगराध्यक्षांचा वचक नाही, तसेच हे कर्मचारी अध्यक्षांचे ऐकत नाहीत, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय गायकवाड यांनी केले आहे. विशेष म्हणजे विशेष सभेमध्ये मुख्यधिकारी महेश वाघमोडे यांच्यासह १७ ते २० नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. नगराध्यक्षा नजमुनिस्सा मोहम्मद सज्जादही या सभेला उपस्थित नव्हत्या.

बुलडाणा नगरपरिषदेवर विशेष सभेला तहकूब करण्याची नामुष्की

नागरी घनकचरा व्यवस्थापन योजनेंतर्गत शहराचे साफसफाई करण्याबाबत विचार करून निर्णय घेणे, शहरात नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना करणे व जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्ती आणि आवश्यक कामे करण्याबाबत विचार करून निर्णय घेणे, शहरातील पथदिवे देखभाल व दुरुस्तीबाबत आवश्यक उपाययोजना करणे करिता विचार करून निर्णय घेणे, अशा नागरिकांच्या मुद्यांवर आज मंगळवारी नगराध्यक्षा नजमुनिस्सा सज्जाद यांनी विशेष सभा बोलावली होती.

या सभेमध्ये नगरपरिषदेतील एक ही खाते प्रमुखांनी उपस्थिती दर्शविली नाही तर परिषदेचे मुख्यधिकारी महेश वाघमोडे व १७ ते २० नगरसेवक-नगरसेविका यांची उपस्थिती होती. सोबत नगराध्यक्षा यांचे पती स्वीकृत नगरसेवक मोहम्मद सज्जाद, खातेप्रमुखांची उपस्थित नसल्यामुळे ही सभा तहकूब करण्याची नामुष्की बुलडाणा परिषदेवर ओढवली. माझ्या २८ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदा पाहिले की, अध्यक्षांनी विशेष सभा बोलावली आणि एकही कर्मचारी-अधिकारी माहिती देण्यासाठी उपस्थित नाही. नगरपरिषदेचे खातेप्रमुख उपस्थित नाही. सद्यस्थितीत विशेष सभेमधील तीनही विषय महत्त्वाचे आहेत. शहरातील पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा तसेच शहरात पसरलेले घाणीचे साम्राज्य. असे असताना नगर परिषेदेचे कर्मचारी इतके बेजबाबदारपणे वागतात की त्यांच्याअभावी सभा तहकूब येण्याची नामुष्की नगर परिषेदेवर येत आहे.
उपमुख्याधिकारी म्हणाले की, विशेष सभा ही अध्यक्षांनी बोलावली आहे. त्यामध्ये आमचा काही संबंध नाही, यामुळे नागराध्यक्षांचा या कर्मचाऱ्यांवर वचक नाही किंवा हे कर्मचारी या अध्यक्षांचे ऐकत नाहीत. तहकूब झालेली सभा १२ जूनला होणार असून, याप्रकरणी आम्ही उत्तरे मागणार आहोत असे शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी नगराध्यक्षांना मागणार आहेत.

Intro:Body:बुलडाणा:- शहरातील महत्वाच्या तीन मुद्यावर नगराध्यक्षांनी बोलावलेल्या विशेष सभेला खाते प्रमुख उपस्थित नसल्याच्या कारणाने सभा तहकूब करण्याची नामुष्की आज मंगळवारी ११ जून रोजी बुलडाणा नगर परिषदेवर ओढवली.नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नगराध्यक्षांचा वचक नसल्याची किंवा हे कर्मचारी या अध्यक्षांना मोजत नाही अशी टीका शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक संजय गायकवाड यांनी केला आहे.विशेष म्हणजे विशेष सभेमध्ये मुख्यधिकारी महेश वाघमोडे यांच्या सह १७ ते २० नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या तर नगराध्यक्षा नजमुनिस्सा मोहम्मद सज्जाद हे ही अनुउपस्थित होत्या..

नागरी घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत शहराचे साफसफाई करणेबाबत विचार करून निर्णय घेणे,शहरात नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा होण्यासाठी उपाययोजना करणे व जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्ती व आवश्यक कामे करणे बाबत विचार करून निर्णय घेणे,शहरातील पथदिवे देखभाल व दुरुस्ती बाबत आवश्यक उपाययोजना करणे करिता विचार करून निर्णय घेणे अश्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या तीन मुद्यांवर आज मंगळवारी नगराध्यक्षा नजमुनिस्सा मो.सज्जाद यांनी विशेष सभा नगर परिषदेत दुपारी १ वाजता बोलावली होती.या विशेष सभेमध्ये नगर परिषदेतील एक ही खाते प्रमुख यांनी उपस्थिती दर्शविली नाही तर परिषदेचे मुख्यधिकारी महेश वाघमोडे व १७ ते २० नगरसेवक-नगरसेविका यांची उपस्थिती होती सोबत नगराध्यक्षा यांचे पती स्वकृत नगरसेवक मोहम्मद सज्जाद .खाते प्रमुखांची उपस्थित नसल्यामुळे ही सभा तहकूब करण्याची नामुष्की बुलडाणा परिषदेवर आज ओढवली.तर माझ्या २८ वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यादा पाहिलं की अध्यक्षांनी विशेष सभा बोलावली आणि एकही कर्मचारी-अधिकारी माहिती देण्यासाठी उपस्थित नाही आहे व परिषदेचे खाते प्रमुख उपस्थित नाही आहे.सद्यस्थितीत विशेष सभेमधील तीनही विषय हॉट आहे,शहरात पाणी टंचाई आहे,शहराला दूषित पाणी पुरवठा होत आहे, शहरात घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे आणि असे असतांना नगर परिषेदेचे कर्मचारी इतके बेजबाबदारपणे वागतात आणि सभा तहकूब येण्याची नामुष्की नगर परिषेदेवर येते एकतर उपमुख्याधिकारी असा बोलला विशेष सभा अध्यक्षांनी काढली त्यामध्ये आमचा काही संबंध नाही यामुळे नागराध्यक्षांचा या कर्मचाऱ्यांवर वचक नाही किंवा हे कर्मचारी या अध्यक्षांना मोजत नाही आणि तहकूब झालेली सभा १२ जून रोजी आहे याबाबत आम्ही याप्रकरणी आम्ही उत्तरे मागणार आहे असल्याची टीका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक संजय गायकवाड यांनी नगराध्यक्षा नजमुनिस्सा मोहम्मद सज्जाद यांच्यावर केली

बाईट- संजय गायकवाड, नगरसेवक

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.