बुलडाणा : यावेळी पुरवठा विभागाने गाडी चालकाला विचारणा केली (Black marketing of ration grains) असता गाडी चालक गाडी सोडून फरार झाला. पुरवठा विभागाची खात्री झाल्यावर (grain supply department) पकडलेला तांदूळ हा राशनच असल्याची खात्री झाली (Ration Rice Seized In Buldana). गाडी चालकांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे(case registered in police station).
धान्याची काळाबाजारी थांबेना : राशनचा होणारा काळाबाजार हा काही नवीन नाही. मागील कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने स्वस्त धान्य दुकानदारामार्फत मोफत धान्य वाटप सुरू केले होते. ते मागील दोन वर्ष सतत देण्यात आले; परंतु शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा रेटा हे मोफत धान्य मिळावे यासाठी आंदोलने निवेदने दिल्यानंतर हे धान्य पूर्ववत सुरू करण्यात आले. असे असताना प्रशासनाने स्वस्त धान्य किंवा मोफत मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ई पॉज मशीन आणली. परंतु ती देखील या काळ्या बाजाराला रोखू शकले नाही. अजूनही सर्रासपणे स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याची उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. यातीलच हा एक प्रकार समोर आला आहे.