ETV Bharat / state

बुलडाणा :...म्हणून भाजपाच्या 'या' महिला आमदाराने साजरी केली 'काळी दिवाळी'

आघाडी सरकारचा निषेध आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या महिला आमदार श्वेता महाले यांनी बुधवारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन चिखली मतदार संघात ठिक ठिकाणी काळे कंदील आणि झेंडे लाऊन काळी दिवाळी साजरी केली.

Buldana
Buldana
author img

By

Published : Nov 5, 2021, 7:47 AM IST

Updated : Nov 5, 2021, 8:20 AM IST

बुलडाणा - विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात संततधार आणि ढगफुटीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडापर्यंत आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. अस्मानी संकटाने तर लुटलेच पण सुलतानाने पण झोडपले, अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. संपूर्ण चिखली विधानसभा मतदार संघात 80 टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना शासनाने केवळ साडेचार हजार शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविले. उर्वरित शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेला असून त्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळे आघाडी सरकारचा निषेध आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांनी बुधवारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन चिखली मतदार संघात ठिक ठिकाणी काळे कंदील आणि झेंडे लाऊन काळी दिवाळी साजरी केली. तसेच शेतकऱ्यांसोबत बेसन-भाकर खाऊन सरकारचा निषेध केला.

आसूड मोर्च्यात दिला होता इशारा -

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी चिखलीत सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आसूड मोर्च्याचे आयोजन केले होते. यावेळी दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केले नाही. तर आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करीत शेतकऱ्यांसोबत काळी दिवाळी साजरी करू, असा इशारा दिला होता.

या आहेत मागण्या -

  • विदर्भातील शेतकऱ्यांना सावत्र वागणूक बंद करुन, चिखली विधानसभेतील शेतकऱ्यांना घोषणा केल्याप्रमाणे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये व बागायती शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत तत्काळ घोषीत करावी.
  • ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
  • पिक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम थेट खात्यात मिळावी.
  • कृषी पंपांना दिवसा किमान 10 तास वीजपुरवठा करावा.
  • शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये मतदानाचा अधिकार परत द्यावा.
  • नादुरुस्त ट्रांसफार्मरची दुरुस्ती तात्काळ 2 दिवसांत व्हावी.
  • शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करावे.
  • कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा.

हेही वाचा - एनसीबीची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर चार कोटींचे हेरॉईन जप्त

Last Updated : Nov 5, 2021, 8:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.