ETV Bharat / state

ऐतिहासिक लोणार सरोवरातील 'सासू-सुनेची विहीर' उघडी; पर्यटकांची संख्या वाढली... - kamalja

यंदाही गत वर्षीप्रमाणेच ही विहीर उघडी पडली आहे. त्यामुळे सरोवरात उतरणाऱ्या पर्यटकांसाठी ही विहीर आकर्षण बनली आहे. जवळपास १९९८ मध्ये प्रथमत: ही विहीर सहजगत्या दृष्टीपथास पडली होती.

लोणार सरोवरातील 'सासू-सुनेची विहीर' उघडी
author img

By

Published : May 18, 2019, 5:12 PM IST

Updated : May 21, 2019, 7:57 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेले लोणार सरोवर आणि याच सरोवरातील प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक विहीर ज्या विहिरीला 'सासू-सुनेची विहीर' म्हणूनही ओळखले जाते, ती विहीर यावर्षी घटत्या जल पातळीमुळे पुन्हा एकदा उघडी पडली आहे, त्यामुळे विहीर पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली आहे.

लोणार सरोवरातील 'सासू-सुनेची विहीर' उघडी

गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस आणि अवर्षणामुळे लोणार सरोवराच्या जल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सरोवरात असलेल्या कमळजा देवीच्या मंदिरासमोर असलेली ही सासू सुनेची विहीर उघडी पडत आहे. २०१७ मध्ये या विहीरीचे प्रथमत: काठ दिसून आले होते. २०१८ मध्ये ही विहीर पूर्णत: उघडी पडली होती. यंदाही गत वर्षीप्रमाणेच ही विहीर उघडी पडली आहे. त्यामुळे सरोवरात उतरणाऱ्या पर्यटकांसाठी ही विहीर आकर्षण बनली आहे. जवळपास १९९८ मध्ये प्रथमत: ही विहीर सहजगत्या दृष्टीपथास पडली होती. मात्र, सरोवराची पाणीपातळीनंतर वाढल्यामुळे ही विहीर पुन्हा पाण्यात गेली होती. आता ती पुन्हा उघडी पडल्याने अभ्यासकांसाठी हा एक उत्सुकतेचा विषय आहे.

विशेष म्हणजे लोणार सरोवराची आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे जाताना खोली कमी होत गेलेली आहे. नेमक्या आग्नेय दिशेलाच ही विहीर असल्याने पाणी पातळी खरोखरच खालावल्याचे जाणवत आहे. लोणार सरोवराचा पौराणिक ग्रंथामध्येही उल्लेख आढळतो. सरोवरातील कमळजा देवीच्या मंदिरानजीक पौराणिक कथेनुसार अगस्ती ऋषींची पत्नी लोपमुद्राने राम वनवासात येथे आले असताना सीतेची ओटी भरली होती, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे कमळजा देवीचे मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील अनेक नागरिकांची ही देवी कुलदेवता आहे. या देवीच्या मंदिरासमोरच ही विहीर आहे.
या विहीरीतील अर्ध्या पाण्याची चव गोड आणि अर्ध्याची खारट आहे. सासू-सुनेच्या या विहीरीतील देवीच्या मंदिराकडील पाणी हे गोड आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूचे पाणी हे खारे आहे. त्यामुळेच तिला सासू-सुनेची विहीर असे संबोधले गेले आहे. भारतीय परंपरेत जलतीर्थ, स्थलतीर्थ, कामतीर्थ, मोक्षतीर्थ असे तिर्थाचे विविध प्रकार सांगण्यात आले आहेत. जलतिर्थामुळे शारीरिक शुद्धी होते व मन प्रसन्न होते, अशी धारणा आहे. जलतीर्थ व मोक्षतीर्थ असे दुहेरी सासू-सुनेच्या विहिरीचे पौराणिक महत्त्व सांगितले जाते. त्यामुळे ही विहीर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला आहे.

Intro:Body:स्टोरी :- ऐतिहासिक लोणार सरोवरातील सासू-सुनेची विहीर पडली उघडी....

पर्यटकांची संख्या वाढली...

विहिरीचे अर्धे पाणी गोड तर खारे...

सौभाग्य तीर्थ म्हणून प्रामुख्याने ओळख...

बुलडाणा :- बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्द असलेलं लोणार च सरोवर आणि याच सरोवरातील प्रसिद्द असलेली ऐतिहासिक विहीर ज्या विहिरीला सासू-सुनेची विहीर म्हणूनही ओळखले जाते ती विहीर यावर्षी घटत्या जल पातळी मूळे पुन्हा एकदा उघडी पडली आहे त्यामुळे विहीर पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस आणि अवर्षणामुळे लोणार सरोवराची जल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे सरोवरात असलेल्या कमळजा देवीच्या मंदिरा समोर असलेली ही सासू सुनेची विहीर उघडी पडत आहे. २०१७ मध्ये या विहीरीचे प्रथमत: काठ दिसून आले होते. २०१८ मध्ये ही विहीर पूर्णत: उघडी पडली होती. यंदाही गत वर्षीप्रमाणेच ही विहीर उघडी पडली आहे. त्यामुळे सरोवरात उतरणार्या पर्यटकांसाठी ही विहीर आकर्षण बनली आहे. जवळपास १९९८ मध्ये प्रथमत: ही विहीर सहजगत्या दृष्टीपथास पडली होती. मात्र नंतर सरोवराची पाणीपातळी नंतर वाढल्यामुळे ही विहीर पुन्हा पाण्यात गेली होती. आता ती पुन्हा उघडी पडल्याने अभ्यासकांसाठी हा एक उत्सूकतेचा विषय आहे.

बाईट :- सैफन नदाफ (तहसीलदार , लोणार)

विशेष म्हणजे लोणार सरोवराची अग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे जातांना खोली कमी होत गेलेली आहे. नेमक्या अग्नेय दिशेलाच ही विहीर असल्याने पाणी पातळी खरोखरच खालावल्याचे जाणवत आहे. लोणार सरोवराचा पौराणिक ग्रंथामध्येही उल्लेख आढळतो. सरोवरातील कमळजा देवीच्या मंदिरानजीक पौराणिक कथेनुसार अगस्ती ऋषींची पत्नी लोपमुद्राने राम वनवासात येथे आले असताना सितेची ओटी भरली होती अशी अख्यायिका आहे. त्यामुळे कमळजा देवीचे मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील अनेक नागरिकांची ही देवी कुलदेवता आहे. या देवीच्या मंदिरासमोरच ही विहीर आहे.
ह्या विहीरीतील अर्धे पाण्याची चव गोड आणि अर्ध्याची खारट आहे. सासू-सुनेच्या या विहीरीतल देवीच्या मंदिराकडील पाणी हे गोड आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूचे पाणी हे खारे आहे. त्यामुळेच तिला सासू-सुनेची विहीर असे संबोधल्या गेले आहे.

बाईट :- देवानंद सानप (स्थानिक नागरिक)

भारतीय परंपरेत जलतीर्थ, स्थलतीर्थ, कामतीर्थ, मोक्षतीर्थ असे तिर्थाचे विविध प्रकार सांगण्यात आले आहेत. जलतिर्थामुळे शारीरिक शुद्धी होते व मन प्रसंन्न होते, असी धारणा आहे. जलतिर्थ व मोक्षतीर्थ असे दुहेरी सासू-सुनेच्या विहीरीचे पौराणिक महत्त्व सांगितल्या जाते. त्यामुळे ही विहीर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : May 21, 2019, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.