ETV Bharat / state

Tupkar's agitation : तुपकरांच्या आंदोलनात कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या वाहनांवर केली दगडफेक - कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेख रफीक शेख करीम यांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलन मंडपासमोरच स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु तेथे उपस्थित पोलीस व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना वेळीच आवरले. यावेळी कार्यकर्त्यांचा संयम सुटला. काही कार्यकर्त्यांनी येथील चिखली रोड बंद केला.

आत्मदहनाचा प्रयत्न
आत्मदहनाचा प्रयत्न
author img

By

Published : Nov 20, 2021, 3:34 AM IST

Updated : Nov 20, 2021, 3:46 AM IST

बुलडाणा - सोयाबीनला 8 हजार तर कापूसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे गेल्या तीन दिवसापांसून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन (Tupkar's agitation) सुरु आहे. याच आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले आहे. दरम्यान शुक्रवारी (काल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेख रफीक शेख करीम यांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलन मंडपासमोरच स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु तेथे उपस्थित पोलीस व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना वेळीच आवरले. यावेळी कार्यकर्त्यांचा संयम सुटला. काही कार्यकर्त्यांनी येथील चिखली रोड बंद केला. रस्त्यावर बसून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली.

तुपकरांच्या आंदोलनात कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
तुपकरही आले उपोषण मंडपाच्या बाहेर

आत्मदहनाचा प्रयत्न करणारे शेख रफीक यांना पोलिसांनी घेवून गेल्यानंतर तेथे उपस्थित कार्यकर्ते संतप्त झाले होते. अशातच काही कायकर्ते बुलडाणा-चिखली मार्गावर जावून बसले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. कार्यकर्त्यांची भावना समजून तिन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत असलेले रविकांत तुपकर हे सुध्दा आंदोलन मंडपातून तेथे पोहचले. मात्र कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेत एका वाहनाखाली शिरण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ याठिकाणी गोंधळ उडालेला होता.

पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

अन्नत्याग आंदोलन करणारे रविकांत तुपकर स्वत: रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केल्याने कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. शहर ठाणेदार प्रदीप साळुंके, ग्रामीणचे ठाणेदार गिरीष ताथोड, तुपकर यांच्याशी चर्चा करत असतांना दुसऱ्या ठिकाणी काही आक्रमक कार्यकर्त्यांनी रस्त्याने जात असलेल्या एका रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या बाजुला उभी असलेली शहर ठाण्याच्या वाहनावर काहींनी दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्याठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांना शांत करुन आपल्या सोबत आंदोलन मंडपात आणले. त्यानंतर आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा - Farm Laws Repealed : शेतकऱ्यांनी केंद्र सरकारची मस्ती व माज उतरवला - रविकांत तुपकर

Last Updated : Nov 20, 2021, 3:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.