बुलडाणा - शेतातून गेलेल्या विद्युत तारेत शॉट सर्किट झाल्याने नांद्राकोळी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील एक एकर ऊस व तीन एकरात लावलेले ठिंबक पूर्णपणे जळून खाक झाले झाल्याची घटना शनिवारी (८ मे) सकाळी घडली. त्यामुळे शेतकऱ्याचे जवळपास 6 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथील शेतकरी डिगंबर राऊत यांनी आपल्याकडील चार एकर शेतीपैकी तीन एकरात उसाची लागवड केली होती, आता आहे ऊस काढणीला आला होता. मात्र आज शनिवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्युत तारेवर शॉटसर्किट झाल्याने शेतातील उभ्या असलेल्या ऊसाला आग लागली या आगीत साडे तीन लाखाचे एक एकरातील ऊस व दोन लाखाचे तीन एकरात केलेले ठिंबक जळून खाक झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याचा मुलगा योगेश डिंगबर राऊत यांनी केली आहे.
नुकसान पाहून शेतकरी अस्वस्थ -
शेतकरी डिगंबर राऊत यांनी आपल्या शेतात उसाची लागवड केली होती. शनिवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्युत तारेवर शॉट सर्किट झाल्याने काढणीला आलेल्या ऊस व ठिबक जळाले. ही माहिती मिळाल्यानंतर शेतकरी डिगंबर राऊत हे आपल्या नांद्राकोळी शिवारातील शेतात गेले. त्यांनी शेतातील ठिबक व ऊस जळाल्याचे पाहल्यावर त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट मोदी सरकारची निती व चुकीच्या नियोजनाचा परिणाम!