बुलडाणा - आज (शनिवारी) राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे बुलडाणा दौऱ्यावर आले होते. मात्र, या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रकल्पांना ठिकठिकाणी भेटीचे असलेले नियोजन रद्द केल्याने हा दौरा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार असल्याचा आरोप, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी केला आहे.
आमदार फुंडकर यांची प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, ते शेतकऱ्यांच्या पोक्रा अंतर्गत राबिविण्यात येत असलेल्या बाबी, क्रॉपसॅप अंतर्गत कपाशी प्लँट आणि शेतकरी उत्पादक प्रकल्पांना भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार होते. मात्र हे सर्व रद्द करण्यात आले असून फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक ठेवण्यात आली. यामुळे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा दौरा फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका आकाश फुंडकर यांनी केली आहे. तसेच सरकारचा या कृतीचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत खामगाव येथे आमदार फुडकरांनी कृषीमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
हेही वाचा - वीज बिल माफीच्या प्रस्तावावर वित्त विभागात अंधार