बुलडाणा - केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहे सुरु करावेत, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत शासनाने नोकरभरती करू नये, सर्व स्पर्धा परीक्षेतील व सारथीमधील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज (गुरुवारी) खामगाव उपविभागीय कार्यालयासमोर 'डफडे बजाव आंदोलन' केले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलने केली. त्यानंतरही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागू शकला नसल्याची खंत समाजातून व्यक्त होत आहे. त्यामुळे मराठा समाजातून सरकारबद्दल तीव्र रोष व्यक्त करत केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहे सुरु करावेत, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत शासनाने नोकरभरती करू नये, सर्व स्पर्धा परिक्षेतील व सारथीमधील जाचक अटी रद्द कराव्यात यासह अन्य मागण्यांबाबत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांना १५ सप्टेंबरला निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप राज्य शासनाकडून तोडगा निघू शकलेला नसल्यामुळे आज खामगावात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी खामगाव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन केले. मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक विचार न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशाराही यावेळी देण्यात आला आहे.
हेही वाचा - 'आधी मराठा आरक्षण नंतर पोलीस भरती; अन्यथा परिणामांना सामोरे जा'