बुलडाणा - जिल्ह्यात सर्वाधिक 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) 17 फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. ही परिस्थिती पाहता आजच्या आदेशाने शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. तसेच शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी शंकर रामामुर्थी याबाबत माहिती देताना. संचारबंदी लागू -
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष शंकर रामामुर्ती यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, शासन आदेश दिनांक 29/01/2021 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) मधील तरतुदीनुसार कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करून बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी लागू केली आहे.
हेही वाचा - महागाईचा 'कळस': नऊ दिवसात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महाग
आदेशातील प्रमुख बाबी काय?
1. शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.
2. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ ५० व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक आणि रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
3. लग्नसमारंभाकरिता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्नसमारंभाकरिता रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी असेल. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
4. लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी.
5. हॉटेल/पानटपरी/चहाची टपरी/चौपाटी, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. याठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासन यांनी नियंत्रण ठेवण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास संबंधित व्यावसायिक/दुकानदारावर कारवाई करण्यात येईल. 6. जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये/ कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहील7. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही, याबाबत स्थानिक प्रशासन (महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत/ग्रामपंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना त्याच स्तरावरुन करुन गर्दीस प्रतिबंध करण्यात यावा.8. जिल्ह्यामधील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.9. या कालावधीत ऑनलाइन/दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील.10. खासगी आस्थापना/दुकाने या ठिकाणी मास्क/फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलमध्येसुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. याबाबत दर्शनी भागात बॅनर/फलक लावणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी.11. हॉटलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही, याबाबत योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करण्यात याव्यात. तसेच दर्शनी भागात फलक लावण्यात यावा.12. अतिथी/ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स/मास्क/हातमोजे यांची संबंधितांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.13. यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव फैलाव होवू नये, याकरिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उललंघन होणार नाही, याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.14. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार सायंकाळी चार वाजेनंतर बंद ठेवण्यात यावे.