ETV Bharat / state

Major Accident Buldana : शेगावला जाणाऱ्या बोलेरो गाडीला अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू - भीषण अपघात बोलेरो आणि ट्रक बुलडाणा

जालना जिल्ह्यातील नेर या गावातील काही लोक शेगाव येथे येत असताना खामगाव जालना रस्त्यावरील देऊळगाव राजा रस्त्यावर असलेल्या जालना टी पॉईंटवर बोलरो आणि ट्रकमध्ये अपघात ( Bolero-Truck Major Accident ) झाला.

accident on khamgaon jalna road, 5 died
शेगावला जाणाऱ्या बोलेरो गाडीला अपघात
author img

By

Published : Mar 14, 2022, 9:33 AM IST

Updated : Mar 14, 2022, 10:09 AM IST

बुलढाणा - खामगाव-जालना मार्गावर बोलेरो आणि ट्रकच्या भीषण अपघात झाला. ( Bolero-Truck Major Accident ) या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. बोलेरो चालक, 1 महिला आणि 3 पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. जखमींना देऊळगाव राजा ( Deulgaon Raja ) आणि जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

अपघातस्थळाची दृश्ये

जालना जिल्ह्यातील नेर या गावातील काही लोक शेगाव येथे येत असताना खामगाव जालना रस्त्यावरील देऊळगाव राजा रस्त्यावर असलेल्या जालना टी पॉईंटवर बोलरो आणि ट्रकमध्ये अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यामधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले आहे. जखमींना देऊळगाव राजा आणि जालना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - Accident On Pandharpur Road : भाविकांच्या ट्रॅक्टरला अपघात; चारजण जागीच ठार, तर 6 गंभीर जखमी

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, मृत आणि जखमींची नावे अद्याप कळू शकली नाही. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Last Updated : Mar 14, 2022, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.