बुलडाणा - जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह गावाच्या शिवारात आढळला आहे. मृत विजय शंकर केदार (४०) ही व्यक्ती सोमवारी 23 नोव्हेंबर सकाळी 11 वाजल्यापासून घरून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नव्हता. मंगळवारी त्याचा मृतदेह सुनगाव जवळील दिनेश ढगे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.
मृत विजय केदारचा मृतदेह गावातील रामदास केदार यांना आढळला. त्यांनी गावचे पोलीस पाटील तळवी यांना माहिती दिली. त्यांनी या घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीआय घुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल तैय्यब अली, पोलीस कॉन्स्टेबल इंगळे, पोलीस शिपाई वावगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्याचा मृतदेह विहिरीतून गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव जामोद येथे पाठवला.
या व्यक्तीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या की आत्महत्या याचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा व्यक्ती विवाहित असून त्याला 9 वर्षाचा मुलगा आहे.
हेही वाचा -जळगावात पत्नीच्या मृत्यूनंतर तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करुन घेतला सर्वांचा निरोप
हेही वाचा -तुळजापूर तालुक्यात दुष्काळ व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या