ETV Bharat / state

कौतुकास्पद..! मृतदेहांची चिरफाड करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहायता निधीला दिले एक महिन्याचे वेतन

अफसर यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी मोहम्मद यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मोहम्मद अफसर बाबत नक्कीच अभिमान आहे. अशा कर्मचाऱ्यांमुळे काम करण्याचे बळ मिळते, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रेमचंद पंडित यांनी व्यक्त केली आहे.

help to cm relief fund buldana
सफाई कामगार मोहम्मद अफसर आणि डॉ. प्रेमचंद पंडित
author img

By

Published : May 9, 2020, 8:43 PM IST

Updated : May 10, 2020, 1:20 PM IST

बुलडाणा- देशात कोरोनाविषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूला अटकाव करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व सुरक्षा रक्षक जिवाचे राण करत आहे. नागरिकांकडूनही लॉकडाऊनचे पालन करून कोरोनाच्या लढाईला हातभार लावले जात आहे. नागरिकांच्या सहयोगाबरोबरच शासनाला आर्थिक सहायतेची देखील गरज आहे. हे समजून जिल्हा सामान्य रुग्णालयातील सफाईगार मोहम्मद अफसर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आपला एक महिन्याचा पगार दिला आहे.

माहिती देताना सफाई कामगार मोहम्मद अफसर आणि डॉ. प्रेमचंद पंडित

सध्या आपल्या देशात कोरोनाचे संकट आहे. या विषाणूला रोखण्यासाठी देशातील नागरिक आपापल्या परीने योगदान देत आहेत. आतापर्यंत शासनाने मला संभाळले आहे. मुलांचे शिक्षण, लग्न हे सर्व नौकरीवरून झालेले आहे. मात्र, आता शासनाला माझी गरज आहे, त्यामुळे मी माझा एक महिन्याचा पगार जो २३ हजार रुपये इतका आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीला दान दिला आहे, अशी भावना मोहम्मद अफसर यांनी व्यक्त केली आहे.

अफसर यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी मोहम्मद यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मोहम्मद अफसर बाबत नक्कीच अभिमान आहे. अशा कर्मचाऱ्यांमुळे काम करण्याचे बळ मिळते, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रेमचंद पंडित यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मोहम्मद यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा- लोणारमध्ये प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Last Updated : May 10, 2020, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.