बुलडाणा : विधानपरिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या (Buldana Voting 2021) निवडणकीकरीता आज 10 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. मतदान सर्वत्र शांततेत झाले. या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 11 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावरती आज सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.
जिल्ह्यात एवढे मतदानापैकी एवढे झाले मतदान
जिल्ह्यात एकूण स्थानिक प्राधिकारी पुरूष मतदार 169 व स्त्री मतदार 198 आहेत. एकूण मतदार जिल्ह्यात 367 आहेत. त्यापैकी 165 पुरूष मतदारांनी, तर 194 स्त्री मतदारांनी मतदान केले आहे. अशाप्रकारे एकूण 359 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाची टक्केवारी 97.82 आहे.तसेच जिल्ह्यात निवडणूकीसाठी एकूण मतदार 367 आहेत. मतदान केंद्र निहाय मतदार संख्या : बुलडाणा – पुरूष 40, स्त्री 62 एकूण 102, चिखली : पुरूष 16, स्त्री 14 एकूण 30, दे. राजा : पुरूष 9, स्त्री 12, एकूण 21, सिं. राजा : पुरूष 10, स्त्री 9 एकूण 19, लोणार : पुरूष 7, स्त्री 13 एकूण 20, मेहकर : पुरूष 14 व स्त्री 13, एकूण 27, खामगांव : पुरूष 18 व स्त्री 19, एकूण 37, शेगांव : पुरूष 15 व स्त्री 17, एकूण 32, जळगांव जामोद : पुरूष 11 व स्त्री 10, एकूण 21, नांदुरा : पुरूष 11 व स्त्री 15, एकूण 26, मलकापूर : पुरूष 18 व स्त्री 14, एकूण 32.
तालुका निहाय एवढे झाले मतदान
जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण केंद्र, मतदान केलेले पुरूष व स्त्री मतदार :
मलकापूर – तहसील कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 15, स्त्री 12, एकूण 27,
जळगांव जामोद – तहसील कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 11, स्त्री 10, एकूण 21,
शेगांव – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 14, स्त्री 16, एकूण 30,
नांदुरा – पंचायत समिती, पुरूष 11, स्त्री 15, एकूण 26,
बुलडाणा – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 40, स्त्री 61 व एकूण 101,
खामगांव – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 18, स्त्री 19, एकूण 37,
चिखली – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 16, स्त्री 14, एकूण 30,
मेहकर – पंचायत समिती, पुरूष 14, स्त्री 13 व एकूण 27,
दे. राजा – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 9, स्त्री 12, एकूण 21,
सिं. राजा – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 10, स्त्री 9 व एकूण 19,
लोणार – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 7, स्त्री 13 व एकूण 20 मतदार आहेत.
हेही वाचा - Kolhapur Public Address System : आता एकाचवेळी देता येणार 650 गावांत संदेश; देशातला पहिलाच उपक्रम