वाशिम - जिल्ह्यातील तोंडगाव येथील श्रीकृष्ण विद्यालयात शिक्षक व लिपिक पदावर बोगस भरती करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्याध्यापकांसह 6 कर्मचाऱ्यावर फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
6 शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्या-
वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथील श्रीकृष्ण विद्यालयात मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यानी संगनमत करून 6 शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्या केल्या. तसेच शासनाची 6 लाख 34 हजार 793 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी संस्थेचे सचिव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
शासनाचे लाखो रुपये हडप-
न्यायालयाने दोषी विरोधात तक्रार दाखल करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार रमेश दामोदर तांगडे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तोंडगाव येथील श्रीकृष्ण विद्यालयात नितीन रमेश राऊत, अशोक ज्ञानबा भिसडे, अमोल माणिक गोटे, विकास बळीराम मोरे, गणेश सुरेश गोटे, सुनील कुंडलिक कांबळे, सुभाष कचरू अंभोरे आदी कर्मचाऱ्यांनी कर्मचारी भरती बंद दरम्यान संगनमत करून सहायक शिक्षक, शिक्षण सेवक, लिपिक व प्रयोग शाळा सहायक अशा प्रकारच्या नियमबाह्य नियुक्त्या करून वेतनपोटी शासनाचे लाखो रुपये हडप केले आहेत.
या प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून झालेल्या प्रकारची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये भरतीबंद काळात नियुक्त्या केल्याचे स्पष्ट झाले. तसेच दोषी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - पूजा चव्हाण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिय