बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा 3 नवीन रुग्ण आढळले आहेत. मोताळा येथील 9 वर्षीय मुलगा, हाश्मी नगर मलकापूर येथील 35 वर्षीय महिला व घासलेटपुरा नांदुरा येथील 45 वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर 13 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनावर मात केल्याने 13 रुग्णांना सुट्टी -
- खामगाव कोविड रुग्णालयातून जनुना येथील 34 वर्षीय पुरूष रुग्ण
- शेगाव कोविड रुग्णालयातून संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 65 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष व 18 वर्षीय तरुण रुग्ण
- बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून पारपेट मलकापूर येथील 59 वर्षीय पुरूष, 43 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, 3 व 6 वर्षाच्या मुली, 10 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी
- डोणगाव येथील 20 वर्षीय महिलेला रुग्णालयातून सुट्टी, अशाप्रकारे आज 13 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना आज घरी पाठविण्यात आले.
जिल्ह्यात तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या स्वॅबच्या अहवालांपैकी 56 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 53 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 3 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. तसेच आतापर्यंत 2 हजार 326 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 169 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 135 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 24 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.