बुलडाणा - जिल्ह्यात बुधवारी रात्री नवीन 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण ३५ कोरोनाबाधितांची जिल्ह्यात नोंद झाली आहे. नवीन कोरोनाबाधितांमध्ये नांदुरा तालुक्यातील १९ वर्षीय तरुण, खामगाव तालुक्यातील २५ वर्षीय तरुण आणि ७० वर्षीय वृद्धाच्या अहवालाचा समावेश आहे. या रुग्णांचा इतिहास पहिला असता तिघेही रेड झोन असलेल्या जिल्ह्यांतून आलेले आहेत.
जिल्हा प्रशासनाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालापैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. बुधवारी दिवसभरात 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. बुधावारी रात्री ज्या रुग्णांचाअहवाल प्राप्त झाला ते मुंबई, पुणे, अकोला जिल्ह्यांतून आलेले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण ३५ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 24 कोरोनाबाधित रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना कोव्हिड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या कोव्हिड रूग्णालयात 8 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.