बुलडाणा - जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भानखेड शिवारातील पोल्ट्रीफार्ममधील 200 देशी कोंबड्या अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 23 जानेवारीला समोर आली आहे. बर्ड फ्लूमूळे या कोंबड्यांचे मृत्यू झाले तर नसावेत या भीतीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान पशु वैद्यकीय विभागाने घटनासाठी धाव घेऊन मृत कोंबड्यापैकी तीन कोंबड्यांचे तपासण्यासाठी नमुने घेतले आहे.
अनेक ठिकाणी एक-दोन अशा काही कोंबड्याही दगावल्या -
बुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नसतांना चिखली तालुक्यातील भानखेड येथील शेतकरी जनार्दन इंगळे यांनी त्यांच्या शेतात 200 देशी कोंबड्यांचे पॉल्ट्रीफार्म सुरू केले होते.शनिवारी 23 जानेवारीला सकाळी ह्या देशी कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.तर याच गावातील इतर नागरिकांच्याही एक-दोन अशा काही कोंबड्या दगावल्याचेही समोर आले.
पशुवैद्यकीय विभाग घटनास्थळी -
या प्रकाराची माहिती मिळताच पशूधन तालुका अधिकारी डॉ. दांडगे, पशूवैद्यकीय लघु चिकित्सालयाचे डॉ. युवराज रगतवान, पर्यवेक्षक डॉ. प्रवीण निळे, डॉ. पूनम तायडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तीन कोंबड्यांचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठवले.अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरे कारण कळू शकेल, असे डॉ. दांडगे यावेळी म्हणाले. पक्षीपालकांनी कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाला कळवावे, असे आवाहनही यावेळी डॉ. दांडगे यांनी केले आहे.
बुलडाण्याच्या चिखलीत 200 देशी कोंबड्यांचा अचानक मृत्यू; जिल्ह्यात खळबळ - बुलडाणा बर्ड फ्लू बातमी
बर्ड फ्लूमूळे या कोंबड्यांचे मृत्यू झाले तर नसावेत, या भीतीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पशु वैद्यकीय विभागाने घटनासाठी धाव घेऊन मृत कोंबड्यापैकी तीन कोंबड्यांचे तपासणीसाठी नमुने घेतले आहेत.