ETV Bharat / state

बुलडाण्यात वेगवेगळ्या आरोपातील 2 आरोपींना अटक

रीच्या सुडीला आग लावून तीन लाख रुपयाचे नुकसान करणाऱ्या तसेच फ्रीज लंपास करणाऱ्या एकास अशा एकुण दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा
स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा
author img

By

Published : Feb 2, 2021, 10:17 PM IST

बुलडाणा - तुरीच्या सुडीला आग लावून तीन लाख रुपयाचे नुकसान करणाऱ्या तसेच फ्रीज लंपास करणाऱ्या एकास अशा एकुण दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे. यावेळी पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातून आठ हजार रुपये किंमतीचा फ्रीज जप्त केेला आहे. ही कारवाई आज मंगळवारी २ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांचे मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांचे आदेशाने मालमत्ते विरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी दोन्ही आरोपींना अटक करण्याची कारवाई करण्यात आली. अक्षय राजू अवसरमोल वय १९ वर्ष व सुनिल मनोहर शेवलकर वय ३४ वर्ष असे दोन्ही आरोपींची नावे आहे.

आरोपी अक्षयच्या ताब्यातून जप्त केले फ्रीज-

३० जानेवारी रोजी एक पथक नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान हे पथक पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना अमडापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयात फ्रिज चोरुन नेणाऱ्या आरोपीची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीसांनी आरोपी अक्षय राजु अवसरमोल (१९ वर्ष) रा.सिध्दार्थ नगर चिखली, यास ताब्यात घेतले. यावेळी त्यांची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी त्याच्या ताब्यातून आठ हजार रुपये किंमतीचा फ्रिज पोलीसांनी जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सुडीला आग लावणारा आरोपी होता फरार-

तर अमडापूर पोलीस ठाण्यातंर्गतच येत असलेल्या आरोपीने एका शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या असलेल्या तुरीच्या सुडीला आग लावली होती. या घटेनत शेतकऱ्याचे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले होते. प्रकरणी शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून अमडापूर पोलींसानी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केला होता. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून सुडीला आग लावणारा आरोपी फरार होता. दरम्यान या प्रकरणातील आरोपीची पोलीसांनी गोपनीय माहिती काढुन सुनिल मनोहर शेवलकर (३४ वर्ष) रा.टाकरखेड हेलगा या आरोपीस ताब्यात घेतले. यावेळी त्याची विचारपूस केली असता त्याने तुरीची सुडी जाळल्याचे कबुल केले.

अटक करण्यात आलेल्या अक्षय राजु अवसरमोल व सुनिल मनोहर शेवलकर या दोघांना पुढील कारवाई साठी दोन्ही आरोपींना अमडापूर पोलीसांच्या हवाली करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांचे आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप आढाव यांच्या पथकाने केली आहे.

हेही वााचा- आता ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.