बुलडाणा - रायपूर येथे 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. सपना अंबादास जमधाडे असे मृत मुलीचे नाव आहे. दगडाने ठेचून निघृणपणे सपनाची हत्या झाली आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.
हेही वाचा - 'राग, द्वेष बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र या' विजयानंतर बायडेन यांचा संदेश
निघृण हत्या
अंबादास जमधाडे आपल्या परिवारासह रायपुर गावाजवळील पांढरी शिवारात आपल्या शेतात राहतात. शनिवारी सपना घरी एकटीच असताना सात वाजेच्या दरम्यान घरातच अंधाराचा फायदा घेत तिच्या डोक्यावर अज्ञात आरोपीने दगडाने वार केले. या हल्यात तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर आरोपी तात्काळ पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच रायपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष दुधाड आपल्या पथका सह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी फॉरेंसिक टीम व श्वान पथकाला ही पाचारण करण्यात आले होते. इतक्या निर्दयीपणे सपनाची हत्या कोणी व का केली असेल? या बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. झालेल्या घटनेमुळे रायपूरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षण : सरकारकडून दडपशाहीने मशाल मोर्चा दडपण्याचा प्रयत्न