ETV Bharat / state

नाली खोदकामात आढळले तब्बल 132 साप; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण - नाली खोदकाम

पिंपळगाव काळे गावात ३० एप्रिलला सायंकाळी नालीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते. त्या ठिकाणी चार ते पाच साप असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले. या तरुणांनी त्या सापांना मारून टाकले. मात्र, थोड्या वेळातच काही व्यक्तींना आणखी साप आढळून आले. त्यानंतर एकापाठोपाठ ३० ते ४० साप आढळून आले. त्यानंतर पुन्हा १ मे ला पुन्हा १३२ साप आढळून आले.

Snake
साप
author img

By

Published : May 3, 2020, 9:48 AM IST

बुलडाणा - जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे नाली खोदकाम करत असताना १३२ साप निघाल्याचा प्रकार समोर आला. ग्रामीण भागात एक-दोन साप दिसले तर फारसे गांभिर्याने घेतले जात नाही. मात्र, एकावेळी १३२ साप निघाल्याने ही घटना आश्चर्यकारकच मानली जात आहे. सर्पमित्र उपलब्ध नसल्याचे सांगत भीतीपोटी या सापांना गावकऱ्यांनी मारून टाकले.

पिंपळगाव काळे गावात ३० एप्रिलला सायंकाळी नालीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते. त्या ठिकाणी चार ते पाच साप असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले. या तरुणांनी त्या सापांना मारून टाकले. मात्र, थोड्या वेळातच काही व्यक्तींना आणखी साप आढळून आले. त्यानंतर एकापाठोपाठ ३० ते ४० साप आढळून आले. त्यानंतर पुन्हा १ मे ला पुन्हा १३२ साप आढळून आले. या सापांमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती गावातील रहिवासी राजेश काळे यांनी दिली आहे. ग्रामपंचायत किंवा वन विभागाच्यावतीने यावर उपयोजना केल्या जाव्यात, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.

राजेश काळे, गावकरी

कोब्रा, पानदिवड आणि कवड्या या तीन जातीचे आहेत साप -

बुलडाणा येथील सर्प मित्र एस. बी.रसाळ यांना पिंपळगांव काळे येथील घटनेची माहिती मिळताच त्यांनी सर्प मित्र शरद जाधव आणि भगत यांना पिंपळगांव काळेला पाठवले. या दोन सर्प मित्रांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मृत सापांमध्ये अतिविषारी कोब्रा सापाची पिले, बिनविषारी पानदिवड आणि कवड्या प्रजातिचा एक साप दिसून आला. एकंदरीत त्या ठिकाणी तीन जातीचे साप आढळूण आले.

सलीम खान, वनपरिक्षेत्र अधिकारी

प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू -

पिंपळगाव काळे या गावात नाली बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात मोठ्या संख्येत साप निघाले. भीतीपायी नागरिकांनी सर्व सापांना मारून टाकले आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याबाबत वन कर्मचारी गावात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम खान यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.