ETV Bharat / state

बुलडाण्यात काळा सोमवारः कंटेनर आणि प्रवासी टाटा मॅजिकचा भीषण अपघात; १३ जण ठार - कंटनेर

मलकापूर येथे नॅशनल हायवे क्रमांक ६ वर भरधाव कंटेनरचा टायर फुटल्याने, कंटेनरने एका प्रवासी टाटा मॅजिकवर जाऊन आदळला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : May 20, 2019, 4:18 PM IST

Updated : May 20, 2019, 8:21 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर येथे नॅशनल हायवे क्रमांक ६ वर भरधाव कंटेनरचा टायर फुटल्याने, कंटेनरने एका प्रवासी टाटा मॅजिकवर जाऊन आदळला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

अपघाग्रस्तस्थळी झालेली गर्दी...

मलकापूर ते अनुराबाद येथे अवैध प्रवाशी वाहतुक केली जाते. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास टाटा मॅजिकने १५ प्रवाशी मलकापूरहून अनुराबादकडे निघाले होते. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मलकापूराजवळ असलेल्या रचना फॅक्टरी समोर नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कंटेनरचा टायर फुटल्याने हा कंटेनर टाटा मॅजिकवर जाऊन आदळला.

या धडकेत टाटा मॅजिकमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अन्य २ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 20, 2019, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.