बुलडाणा - जिल्ह्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिक-ठिकाणी छापे मारून केलेल्या कारवाईत 11 लाख 19 हजार 583 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 125 आरोपींना अटक केली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुलडाणा जिल्ह्यात हातभट्टी दारू 493 लिटर, देशी दारू 683 लिटर, फॉरेन लिकर 11 लिटर, बियर 10 लिटर अशी दारू जप्त केली आहे. उल्लेखनीय म्हणजे जळगाव जामोद शहरालगत मध्यप्रदेशातून येणारा दारू साठाही या पथकाने जप्त केला आहे.
हेही वाचा - विकासकामांचे फक्त फलकच... अलमपूर गाव अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत
याप्रकरणी 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी निरुपमा डांगे, नागपूर विभागाचे उप आयुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक बी. व्ही. पटारे यांनी केली.