बुलडाणा - कोरोना काळात बाजारपेठ बंद असल्याचे पाहून बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचा अडत परवाना घेतलेल्या व्यापाऱ्याने जवळपास 100 शेतकऱ्यांना 80 लाखाचा गंडा घातला आहे. या घटनेनंतर व्यापारी फरार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हाताश झालेल्या शेतकऱ्यांनी यासंदर्भातची तक्रार मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या अडत दुकानदाराविरुद्ध कठोर कारवाई करावी, आमच्या मालाचे पैसे आम्हाला परत द्यावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. रविकांत खडके असे फसवणूक करणाऱ्या अडत्याचे नाव आहे.
कारवाईसाठी शेतकऱ्यांची निवदने-
व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचा शेतमाल परस्पर विकून टाकला. ज्यावेळी शेतकरी त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले त्यावेळेस तो शेतकऱ्याला शिवीगाळ करू लागला, पैसे देण्यास टाळाटाळ करत शेतकऱ्यांनाच अरेरावीची भाषा करू लागला. त्यानंतर शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर व्यापारी रविकांत खडके फरार झाल्याचे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हाताश झालेल्या शेतकऱ्यांनी यासंदर्भातची तक्रार मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी शंकर रामामुर्थी व जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी चौकशी सुरू असून कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.