ETV Bharat / state

कामगार दिन विशेष : वीटभट्टी मजुरांना 'कामगार दिनच' नाही माहित - कामगार दिन

संपूर्ण महाराष्ट्रात आज कामगार दिन साजरा केला जात आहे. मात्र, ज्या कामगारांच्या नावाने हा दिन साजरा केला जातो. त्यांनाच या दिनाविषयी माहिती नाही.

कामगार दिन विशेष : वीटभट्टी मजुरांना 'कामगार दिनच' नाही माहित
author img

By

Published : May 1, 2019, 6:22 PM IST

भंडारा - संपूर्ण महाराष्ट्रात आज कामगार दिन साजरा केला जात आहे. मात्र, ज्या कामगारांच्या नावाने हा दिन साजरा केला जातो. त्यांनाच या दिनाविषयी माहिती नाही. हे सर्व कामगार आज ही कामावर हजर होते. या कामगारांना याबाबत विचारले असता, पोट भरण्यासाठी कामे करावे लागते, घरी राहिल्यास नुकसान होते, असे त्यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्यांमध्ये सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले आहे. मात्र, या रणरणत्या उन्हात वीटभट्टीवर काम करणारे मजूर कामगार दिनीही काम करत आहेत. या कामगारांना १ हजार विटा बनवल्यानंतर ६०० रुपये मिळतात. तर १ हजार विटा बनविण्यासाठी पती-पत्नीला १ दिवस लागतो. म्हणजे १ हजार विटामागे एका व्यक्तीला दिवसाला ३०० रुपये मिळतात. त्यामुळे थंडी असो किंवा उन्हाळा शक्य तेवढे जास्तीत जास्त काम करून पैसे मिळवण्यासाठी हे कामगार अहोरात्र कष्ट करतात.

कामगार दिन विशेष : वीटभट्टी मजुरांना 'कामगार दिनच' नाही माहित

कामगारांना याविषयी कामगार दिनाबाबत विचारले असता, त्यांनी याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. काम बंद ठेवले, तर नुकसान होईल, त्यामुळेही कामावर आल्याचे कामगारांनी सांगितले. दिवसभर कठीण परिश्रम केल्यानंतरही मिळणारी रोजगार हा खूप कमी आहे. मात्र, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हाताला काम मिळते, याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वीटभट्टीवर मागील ३ वर्षापासून प्रत्येक वर्षी ७ महिन्यांसाठी येथे येऊन राहतो आणि काम करतो, असे त्यांनी सांगितले.

कच्च्या विटा भट्टीत टाकून भाजल्या जातात. त्यामुळे या परिसरातील तापमान आणखी वाढते. त्याबरोबरच वीटभट्टीवर राहताना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचे कामगार सांगतात. या असंघटित कामगारांना काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने या सुविधा मिळायला हव्यात. तसेच कामाच्या मोबदल्यात योग्य तो रोजगार मिळावा, यासाठी शासनाने पाऊले उचलण्याची गरज आहे.

Intro:ANC : संपूर्ण महाराष्ट्रात कामगार दिन साजरा केले जात आहे मात्र ज्या कामगारांच्या नावाने हा दिन साजरा केला जातो त्यांना मात्र या दिनाविषयी अजिबात माहिती नाही, हे सर्व कामगार आज ही नित्यनियंप्रमाणे कामावर हजर होते. या कामगारांना विचारले असता आम्हला आपल्या पोट भरण्यासाठी कामे करावे लागतात घरी राहिल्यास नुकसान होईल.

Body:भंडारा जिल्ह्यांमध्ये सध्या सूर्यनारायण आग ओकतो आहे तापमान 45 डिग्रीपर्यंत पोहोचला आहे मात्र या रणरणत्या उन्हात वीटभट्टीवर काम करणारे कामगार कामगार दिनी ही न चुकता पोहोचले आहेत.
अशाच एका वीटभट्टीवर आम्ही पोहोचलो सर्वत्र विटांचा खच, मातीचे ढीग पडलेले होते आणि इथेच एका खोलीचे कच्ची 8 घरे होते. नोव्हेंबर महिन्यापासून तर मे महिन्याच्या शेवटपर्यंत हे कामगार तिथेच कुटुंबासह स्थायिक राहून विटा बनविण्याचे कामे करतात. या कामगारांना हजार विटासाठी सहाशे रुपये मिळतात आणि या हजार विटा बनविण्यासाठी पती-पत्नी यांना संपूर्ण दिवस लागतो म्हणजे हजार विटा मागे एका व्यक्तीला तीनशे रुपये रोजी पडते त्यामुळे थंडी असो किंवा गर्मी शक्य तेवढे जास्तीत जास्त काम करून पैसे मिळवण्यासाठी हे कामगार अहोरात्र कष्ट करतात. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील पाच कुटुंब आणि मध्य प्रदेश चार कुटुंब वीटभट्टी जवळच राहतात. इतर कामगार शेजारच्या गावावरून इथे येऊ कामे करतात. त्यांना 140 स्त्रीची रोजी तर पुरुषांना 200 ते 250 रुपये रोज मिळते.

कामगारांना याविषयी विचारले असता त्यांना याविषयी काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले जर आज काम बंद ठेवला तर आजची रोजी जाईल त्यामुळे आम्ही आजही कामावर आहोत दिवसभर कठीण परिश्रम केल्यानंतर ही मिळणारी रोजी ही खूप कमी आहे मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह करण्यासाठी हाताला काम मिळत आहे याचा समाधान असल्याने आम्ही मागील तीन वर्षापासून दरवर्षी साथ महिन्यांसाठी तिथे येऊन राहतो आणि आपली कामे करतो असे त्यांनी सांगितले.

कच्च्या विटा भट्टीत टाकून त्याला भाजले जाते त्यामुळे परिसरातील तापमान अजूनच वाढतो त्यातच इथे राहताना आणि कामे करताना कोणत्याही सुविधा नसतात मात्र मिळेल त्या परिस्थितीत राहात नाईलाजास्तव हे कामगार इथे काम करीत असतात. या असंघटित कामगारांना कामे करताना सुरक्षेच्या दृष्टीने या सुविधा मिळायला हव्यात आणि कामाच्या मोबदल्यात योग्य रोजी मिळावी यासाठी शासनाने पाऊल उचलावे तसेच कामगार दिनाच्या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी असावी त्यादिवशीची रोजीही त्यांना मिळावी जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवस कामगार स्वतःचे हक्काचा दिवस म्हणून जगू शकतील
बाईट : निताराम खडके
सविता बाभरे,
राजू धकाते, मालक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.