ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरली, मात्र पाण्यासाठी नागरिकांची भटकंती - no water bhandara

ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागालाही पुराने आपल्या कवेत घेतले. या परिस्थितीचा कधी स्वपनातही विचार न केलेल्या लोकांना विस्थापित होऊन शाळांमध्ये आसरा घ्यावा लागला. पुराचे संकट ३ दिवसानंतर ओसरले, मात्र विस्कळीत झालेल्या जल पुरवठा यंत्रणेमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

भंडारा पाणी प्रश्न
भंडारा पाणी प्रश्न
author img

By

Published : Sep 9, 2020, 9:46 PM IST

भंडारा- मागील १० दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. पाणी आले आणि पाण्यानेच पाणी हिरावून घेतले अशी अवस्था जिल्हा वासियांची झाली आहे. शक्य आहे त्यांनी पैसे खर्च करून तहान भागवली. परंतु, जे आर्थिक विवंचनेत आहेत त्यांचे काय? पाण्याशिवाय होणारे हाल काय असतात याचा प्रत्यय जिल्ह्यात आलेल्या पुराने दिला आहे.

माहिती देताना नागरिक

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भंडारा जिल्ह्यात भीषण पूरपरिस्थिती उद्भवली होती. यापूर्वीही जिल्ह्यातील लोकांनी पूर बघितले होते, मात्र या वेळेची परिस्थिती वेगळीच होती. या वेळी ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागालाही पुराने आपल्या कवेत घेतले. या परिस्थितीचा कधी स्वपनातही विचार न केलेल्या लोकांना विस्थापित होऊन शाळांमध्ये आसरा घ्यावा लागला. पुराचे संकट ३ दिवसानंतर ओसरले, मात्र विस्कळीत झालेल्या जल पुरवठा यंत्रणेमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

पुरामुळे भंडारा शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्रे, विहिरी पाण्याखाली गेले आहेत. केंद्रात गाळ साचल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे २८ तारखेपासून बंद झालेला शहराचा पाणीपुरवठा आजही बंद आहे. यापूर्वी तीन चार दिवस ही परिस्थिती राहायची. मात्र यावेळी पुराच्या रौद्र रुपाने हा कालावधी वाढला आहे. अजूनही नगरपालिका प्रशासनाकडून यंत्रणा पूर्ववत करण्याची कसरत सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दारोदारी भटकावे लागत आहे.

टँकरमधून होणारा पाणीपुरवठा लोकांची गरज भागवण्यास अपुरा ठरत आहे. अनेकांना अशुद्ध पाण्याच्या माध्यमातून आपली गरज भागवावी लागत आहे. शक्य आहे त्यांनी पैसे खर्च करून मागील आठ दहा दिवस काढले. मात्र, प्रत्येकालाच हे शक्य होईल असेही नाही. भंडारा शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनांनासुद्धा पुराचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी विजेच्या अभावी तर काही ठिकाणी यंत्रात बिघाड झाल्याने पाणीपुरवठा योजना बंद झाली आहे. शहरी भागातील नागरिक विकतचे पाणी घेऊन गरज भागवून घेतली, मात्र ग्रामीण लोकांचे काय? पुराने त्यांचे बरेच काही हिरावून घेतले आहे.

दहा दिवसांपासून पाण्याच्या निमित्ताने वैतागलेले चेहरे पाहिल्यानंतर पुराची भीषणता काय होती याची कल्पना येऊ शकते. आता बिघाड निघून लवकरात लवकर पुरवठा सुरळीत होणे ही अपेक्षा करण्याशिवाय नागरिक काहीच करू शकत नाही. शेवटी काय तर पाणी आले आणि लोकांचे पाणी हिरावून नेले अशी अवस्था आहे. या विषयी भंडारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना विचारले असता त्यांनी, मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रे आणि नदीतील विहिरींची पूर्ण यंत्रणा नादुरुस्त झाली. २४ तास काम करून दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दोन मोटारींच्या माध्यमातून दोन दिवसात हा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊनमध्ये ब्रॉडबँडला सुगीचे दिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.