ETV Bharat / state

Goa Assembly Election 2022 : 'गोव्यात आमचा नाही, तर शिवसेनेचा एक अंकी आमदार राहील'

author img

By

Published : Jan 15, 2022, 5:08 PM IST

कोणाशी युती केल्याने कोणाचा जागा वाढेल हे येणारी निवडणूक ठरवेल, असा खोचक टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी ( Vijay Wadettiwar Reply To Sanjay Raut ) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. गोव्यात ( Goa Assembly Election 2022 ) कॉंग्रेसला अति आत्मविश्वास नडणार असून गोव्यात कॉंग्रेसचा ( Goa Congress ) एक अंकी आमदार येणार असल्याच्या टोला संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांनी लगावला होता.

Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022 sembly Election 2022

भंडारा - आमची युती फक्त महाराष्ट्रात झाली असून आम्ही केवळ सत्तेत सोबत आहोत. त्यांमुळे गोवा व इतर राज्यात युतीबाबत कांग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहे. कोणाशी युती केल्याने कोणाचा जागा वाढेल हे येणारी निवडणूक ठरवेल, असा खोचक टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी ( Vijay Wadettiwar Reply To Sanjay Raut ) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. गोव्यात ( Goa Assembly Election 2022 ) कॉंग्रेसला अति आत्मविश्वास नडणार असून गोव्यात कॉंग्रेसचा ( Goa Congress ) एक अंकी आमदार येणार असल्याच्या टोला संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांनी केल्यानंतर राऊत यांच्या टिकेचा वड्डेट्टीवार ( Minister Vijay Wadettiwar ) यांनी भंडाऱ्यात चांगलाच समाचार घेतला आहे.

'गोव्यात राहील एक अंकी आमदार' -

संजय राउत यांचे एक अंकी आमदार हे वक्तव्य त्याच्या शिवसेना पक्षाशी संबधित असल्याचे सूचक विधान ही वड्डेट्टीवार यांनी केला असून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा कोणताही फरक पडत नसल्याचा पलटवार वड्डेट्टीवार यांनी केला आहे. शिवसेनेशी आमची युती ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. पक्ष वाढविण्यासाठी अशा प्रकारे भूमिका मांडत असतात. त्यामुळे एक गोव्यात युती झाली नाही, तर आमच्या पक्षाला त्याचा कुठलाही फटका बसणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

'येणाऱ्या काळात शिवसेना युपीएचा घटक होऊ शकतो' -

शिवसेनेला युपीएमध्ये समाविष्ट करून घेण्यासंबधी लोकसभेच्या निवडणुका लागताच कांग्रेस हायकमांड निर्णय घेईल, असे सूचक वक्तव्य मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी केले असून महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्रात 2 वर्ष पूर्ण होत असताना युपीएमध्ये शिवसेनेला समाविष्ट न केल्या बाबत ते बोलत होते. केंद्रामध्ये या भ्रष्टाचारी भाजपाला दूर ठेवण्यासाठी भविष्यात शिवसेना यूपीएचा घटक होईल. संजय राऊत यांच्या कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भेटीगाठी होत असून लवकर शिवसेनेचा युपीएमध्ये समाविष्ट होणार असल्याच्या विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Sachin Joshi Assets Seized ED : बॉलीवुड अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशीची 410 कोटींची संपत्ती ईडी कडून जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.