भंडारा - जिल्हा सामान्य रुगालयातील शिशू केयर सेंटरला आग लागून 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाला, तर अन्य 7 बालकांना वाचविण्यात यश आले. आपल्या पोटचा मुलाचा असा अंत्य होईल, असा विचारदेखील त्यांचा पालकांनी केला नव्हता. भोजापूर येथील बेहरे कुटूंबियातील 2 महिन्यांच्या मुलीचा या घटनेत मृत्यू झाला.
दोषींवर कारवाई करण्याती मागणी -
भंडारा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या भोजापूर येथील बेहरे कुटुंबाने काल रात्री जिल्हा सामान्य रुग्नालयातील शिशु केयर सेंटरमध्ये लागलेल्या आगीत आपल्या दोन महिन्यांचा चिमुकलीला गमावले आहे. तिचा असा दुर्दैवी अंत होईल, असा विचारदेखील त्यांनी केला नव्हता. या जन्मजात मुलीचे वजन खूप कमी होते. त्यामुळे दोन महिन्यांपासून या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आहे होते. आता कुठे तिची तब्बेत ठीक होत होती. ही गोंडलमुलगी आज न उद्या स्वतःचा घरी येईल, अशी आशा तिचा आई वडिलानां होती. मात्र, काळाने तिला हिरावून घेतले. त्यामुळे या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याती मागणी तिच्या आई वडिलांनी केली आहे.
हेही वाचा - म्हात्रे दाम्पत्यावर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक