भंडारा - पेरॉलवर असलेल्या कुख्यात गुंडाच्या हत्येच्या प्रकरणात भंडारा पोलिसांनी गावातील दोन तरुणांना अटक केली आहे. क्षुल्लक भांडणातून आणि स्वतःच्या जिवाच्या भीतीपोटी या तरुणांनी हा खून केल्याचे समोर आले आहे. कोणताही पुरावा नसताना केवळ संशयाच्या आधारे खुनाचे आरोपी शोधून गजाआड करण्यात 25 दिवसांनी भंडारा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश मिळाले. सोनिक अरुण मेश्राम 19 वर्ष, रा. गोपेवाडा, अभिषेक प्रमोद मेश्राम 21 वर्ष रा. शहापूर असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
माहिती देताना पोलीस अधिकारी आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता मृतभंडारा तालुक्यातील शहापूर या गावात राहणारा सुधाकर रामटेके या कुख्यात गुंडाचा 25 आक्टोबर रोजी शहापूर गावाबाहेर मृतदेह आढळून आला. सुधाकर रामटेके हा नागपूर येथील कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. त्याच्यावर खून, बलात्कार, खंडणी असे 21 गंभीर गुन्हे होते. कोरोनामुळे त्याला कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आले. कारागृहातून आल्यानंतर सुधाकर यांनी शहापूर येथे पानटपरी सुरू केली. या पानटपरीवर सुधाकर याचा गावातील सोनिक मेश्राम या 19 वर्षीय तरुणासोबत वाद झाला. त्यात सुधाकर याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भविष्यात हा आपली हत्या करेल, त्या अगोदर याची हत्या करावी, असा विचार करत सोनिकने त्याचा चुलत भाऊ अभिषेकच्या मदतीने सुधाकर याची हत्या करण्याचे ठरविले.
दारू पाजून केली तीक्ष्ण हत्याराने हत्यासुरुवातीला 23 सप्टेंबर रोजी त्याची हत्या करण्याची प्रयत्न केला गेला मात्र त्यादिवशी सुधाकर पानटपरीवर आलाच नाही. त्यामुळे पुन्हा 25 सप्टेंबरला हत्येचा कट रचला गेला. 25 ऑक्टोबर ला सुधाकर, अभिषेक आणि सोनिक या तिघांनी मिळून मद्यप्राशन केला. त्यानंतर हे तिघेही घरी निघून गेले. मात्र सुधाकर ची हत्या करण्याचा बेत पहिल्यापासून ठरला असल्याने सोनिक आणि अभिषेक यांनी रात्री अडीच वाजेच्या सुमारास सुधाकराला मंद धुंद अवस्थेत त्याच्या घरून पुन्हा दारू पिण्यासाठी चल असं म्हणत दुचाकीवर बसवून गोपीवाडा काव्याकडे नेले तेथे पुन्हा दारू पाजली आणि अभिषेकने सुधाकर च्या पोटावर दोन वार केले तर सोनीने त्याच्या मानेवर तीन वार करून त्यांची हत्या करून घटनास्थळाहून पसार झाले.
पुरावे मिळत नसतानाही पोलिसांनी शोधला गुन्हेगारसुधाकर याची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अनेक ठिकाणी चौकशी करून आणि फोन कॉल्स तपासून सुद्धा आरोपींचा सुगावा लागत नव्हता. परंतु स्थानीय गुन्हे शाखा आणि जवाहर नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी खुनाच्या दिवशी गस्ती दरम्यान आरोपी आणि मृतक यांना रात्री 2 वाजता एकत्र बघितले होते. केवळ या माहितीच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली असता दोन्ही आरोपी गावातून गायब असल्याने लक्षात आले. त्या नुसार अधिक तपास केला असता दोन्ही आरोपींना नागपूर येथून अटक करण्यात आली. आरोपी हे चुलत भाऊ असून मृतका सोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता आणि मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे हा आपल्याला मारून टाकेल या भीतीपोटी आरोपींची त्याचा खून केल्याचे उघड झाले आरोपींना अटक झाल्यामुळे गावातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.