ETV Bharat / state

बसच्या  धडकेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू - बस चालक

सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाळूचा ट्रक क्र. एमएच. 31 सीक्यू 9564 हा तुमसर वरून रामटेकच्या दिशेने जात होता.

बसच्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Jul 11, 2019, 3:21 PM IST

भंडारा - जिल्ह्यातील तुमसर-रामटेक रस्त्यावर कान्द्री गावाजवळ बसने ट्रकला धडक दिल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. देवेंद्र नथ्थुजी काळसर्पे (रा. नागपूर) असे मृत चालकाचे नाव आहे. या अपघातानंतर बस चालक घटना स्थळावरून पसार झाला आहे. ही मानव विकासची विद्यार्थी बस होती. बसमधील विद्यार्थी अपघाताच्या काही वेळा पूर्वी उतरल्यामळे मोठा अनर्थ टळला.

बसच्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाळूचा ट्रक क्र. एमएच. 31 सीक्यू 9564 हा तुमसर वरून रामटेकच्या दिशेने जात होता. कान्द्री गावाच्या जवळ या ट्रक पंचर झाल्यामुळे चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावला. ट्रकच्या मागे झाडाच्या हिरव्या फांद्याही लावल्या. आणि जॅक लावून टायर काढण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, यावेळी अचानक मागून आलेल्या बस क्र. एमएच. 07 सी 9524च्या चालकाने जोरदार धडक दिल्याने या ट्रकला लावलेले जॅक घसरले. त्यामुळे टिप्पर चालक हा चाकाखाली आल्याने त्याचा टायरमध्ये दबून जागीच मृत्यू झाला.

बस ही तुमसर वरून रामटेकच्या दिशेने जात होती. मानव विकासची ही बस असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी होते. मात्र, अपघाताच्या पूर्वी हे सर्व विद्यार्थी आपल्या स्थानकावर उतरल्याने मोठा अपघात टळला आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये चालक, वाहक आणि केवळ एक व्यक्ती होता.

या अपघाताची माहिती मिळताच, आंधळगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. तर मृतदेहला शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. बस चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:Body:Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक रोड वर कान्द्री गावाजवळ बसने टिप्परला धडक दिल्याने टिप्पर चालकाचा मृत्यू झाला आहे, देवेंद्र नथ्थुजी काळसर्पे राहणार नागपूर असे मृतक चालकाचे नाव असून अपघातानंतर बस चालक घटना स्थळावरून पसार झाला आहे. ही मानव विकास ची बस असल्याने विद्यार्थी असतात मात्र अपघाताच्या काही वेळा पूर्वीच सर्व विद्यार्थी उतरल्याने मोठा अनर्थ टळला.
सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाळूचा टिप्पर क्र. MH-31 CQ-9564 हा वाळूचा ट्रक तुमसर वरून रामटेक च्या दिशेने जात असतांना कान्द्री गावाच्या जवळ या टिप्परचा चाक पंचर झाला, त्यामुळे चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला लावून टिप्पर च्या मागे झाडाच्या हिरव्या फांद्या ही लावल्या आणि नंतर जॅक लावून टायर काढण्याचा प्रयत्न करीत असतांना अचानक मागून आलेल्या बस क्रमांक MH_07 C 9524 या चालकाने जोरदार धडक दिल्याने जॅक घसरले त्यामुळे टिप्पर चालक हा चाकाखाली आल्याने त्याच्या टायर मध्ये दबून जागीच मृत्यू झाला. बस ही तुमसर वरून रामटेक च्या दिशेने जात होती, मानव विकासची ही बस असल्याने या मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी होते मात्र अपघाताच्या पूर्वीच हे सर्व विद्यार्थी आपल्या स्थानकावर उतरल्याने अपघाताच्या वेळी चालक, वाहक आणि केवळ एक व्यक्ती असल्याने मोठा अपघात टाळला आहे. आज पर्यंत वाळू च्या टिप्पर ने अपघात केल्याची घटना आपण बरेच द घडली मात्र आज या टिप्पर चालकांची कोणतीही चूक नसतांना त्याचा जीव गेला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच आंधळगाव पोलीस घटना स्थळी पोहचून मृतकला शव विच्छेदनासाठी नेण्यात आले असून बस चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.