ETV Bharat / state

कॅनॉलमध्ये बस्तान मांडून बसलेल्या वाघाला जंगलात हुसकावून लावण्यात वन विभागाला यश - hunt

तुमसर तालुक्यातील बघेडा/गर्रा गावात वाघाने शेळीची शिकार केल्याची घटना घडली. वाघाने शिकार करून आपल्या भक्ष्यासह बावणथडी कॅनॉलच्या पाईपमध्ये बस्तान मांडले होते.कॅनॉलमध्ये बसलेल्या या वाघाला पाहण्यासाठी बघ्यानी एकच गर्दी केली होती.

भंडारा
author img

By

Published : May 24, 2019, 5:08 PM IST

भंडारा - तुमसर तालुक्यातील बघेडा/गर्रा गावात वाघाने शेळीची शिकार केल्याची घटना घडली. वाघाने शिकार करून आपल्या भक्ष्यासह बावणथडी कॅनॉलच्या पाईपमध्ये बस्तान मांडले होते. वनविभाग व सेव्ह इकोसिस्टिम अँड टायगर (सीट) टीमला 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्रीच्या सुमारास वाघाला कॅनालमधून जंगलाकडे हुसकावून लावण्यात यश आले.

कॅनॉलमध्ये बसलेल्या या वाघाला पाहण्यासाठी बघ्यानी एकच गर्दी केली होती. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत पवनारा बिटच्या कंपार्टमेंट नं. 18 मध्ये ही घटना घडली आहे. तेथील बघेडा/गर्रा गावाच्या मोठ्या तलावाजवळील शेतात अर्जुन रामलाल ठाकुर बकऱ्या चारत होते. त्यावेळी वाघाने अचानक कळपावर हल्ला चढवला. कळपातील २ वर्षांच्या शेळीची शिकार करून जवळच असलेल्या बावणथडीच्या उजव्या कॅनलच्या पाईपमध्ये जाऊन बसला. संबधीत मालकाने वनविभाग आणि गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली.

शेळीची शिकार करून वाघ शिरला कॅनलच्या पाईप मध्ये

वनविभाग व सीटच्या टीमने कॅनल जवळ बस्थान मांडून दोन कैमरा व ट्रैप लावले. मात्र उन्ह जास्त असल्याने वाघ बाहेर निघायला तयार नव्हता. अखेर रात्री 12 वाजता वाघाला कॅनॉलमधून हुसकावून लावण्यात वन विभागाला यश आले. वाघ पांगली जंगलात पळून गेला, तरीही गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Intro:Body:ANC : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बघेड़ा/गर्रा गावात वाघाद्वारे शैलीचा शिकार करून शिकारासह बावणथडी कैनलच्या पाईप मध्ये बस्तान मांडल्याची घटना घडली असुन याची माहिती वाऱ्या सारखी पसरल्याने बघ्यानी एकच गर्दी केली होती।अखेर वनविभाग व सेव इकोसिस्टम एंड टाइगर (सीट)टीमच्या 12 तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्रीच्या सुमारास कॅनॉल मधून निघुन जंगलाकड़े हुसकावून लावण्यात यश आले आहे.

संबंधित घटना तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत पवनारा बिटच्या कंपार्टमेंट नं. 18 मध्ये घडली असुन काल सकाळ च्या सुमारास बघेड़ा/गर्रा गावाच्या मुख्य तळयाजवळ अर्जुन रामलाल ठाकुर हे गावाच्या मोठ्या तलावा जवळ शेतात बकऱ्या चरवित असतांना कळपावर वाघाणे अचानक हल्ला करून 2 वर्षाची एक शेळी शिकार करून जवळच असलेल्या बावणथड़ीच्या उजव्या कॅनल च्या पाइक मध्ये घेऊन गेला, ही बातमी लगेच संबंधित मालकाने वनविभागाला व गावकाऱ्यांना दिली लागलीच वनविभाग व सीट च्या टीम ने कॅनल जवळ बस्थान मांडून दोन कैमरा व ट्रैप लावले, उन्ह जास्त असल्याने वाघ निघायला तयार नसल्याने अखेर रात्रि 12 वाजता वाघाला कनैल मधून हुसकावून लावण्यात वन विभागा यश आले असुन वाघ पांगली जंगलात पळून गेला आहे, तरी सद्धा गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.