ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात 3 नवे कंटेनमेंट झोन घोषित; पहिल्यांदाच शहरात प्रतिबंधित क्षेत्र - भंडारा लेटेस्ट न्यूज

भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी 3 कंटेंनमेंट झोन जाहीर केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने शहरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला नव्हता. शहरात शुक्रवारी दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने दोन कंटनेमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. लाखणी तालुक्यात एक कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

Bhandara Corona Update
भंडारा कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 21, 2020, 3:13 PM IST

भंडारा- जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळत असल्यापासून पहिल्यांदाच भंडारा शहरात दोन कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. लाखणी तालुक्यात कन्स्ट्रक्शन कंपनी परिसरातही कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. दिल्ली आणि बिहार येथून आलेले चार लोक पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण जिल्ह्यात आल्यानंतर होम क्वारंटाइन होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तीन नवीन कंटेनमेंट क्षेत्र घोषित केले आहेत.

मागील महिनाभरापासून भंडारा जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मात्र, आतापर्यंत हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील नागरिक होते. त्यामुळे आतापर्यंत सर्व कंटेनमेंट क्षेत्र हे ग्रामीण भागात होते. मात्र, शुक्रवारी 13 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. यापैकी भंडारामधील विदर्भ हाऊसिंग सोसायटी कॉलनीतील एक तरुण आणि भंडारा शहरातच असलेल्या भोजापूर गाव या दोन ठिकाणातील तरुण हे दिल्ली वरून आल्यानंतर होम क्वारंटाइन होते. आठ ते दहा दिवस येऊन घरी थांबल्या नंतर त्यांच्यात लक्षणे दिसू लागली होती. त्यानंतर त्यांची तपासणी केल्या नंतर ते पॉझिटिव्ह निघाले. या दरम्यान ते दोघे किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर लोक हे परिसरात फिरले असतील किंवा इतरांच्या संपर्कात आले असतील अशी शंका आहे. त्यामुळे या दोन्ही परिसरात कंटेनमेंट क्षेत्र घोषित करून परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

भंडारा शहरात घोषित केलेले कंटेंनमेंट झोन आणि बफर झोन

जिल्हा परिषद चौक ते राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे क्रॉसिंग, जिल्हा परिषद चौक ते साई मंदिर आणि साई मंदिर ते ओम नर्सिंग होम जवळील रेल्वे क्रॉसिंग ते राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंग या परिसराचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे. बफर झोनमध्ये लक्ष रुग्णालय ते राजीव गांधी चौक, राजीव गांधी चौक ते सिव्हिल लाईन, जिल्हा न्यायालयाच्या मागील भाग ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयमागील रस्ता ते डॉक्टर चोले यांच्या रुग्णालयापासून तर लक्ष रुग्णालयापर्यंत यांचा समावेश आहे.

दुसरा कंटेनमेंट झोन भोजापूर खोकला सीमा रस्ता (दक्षिण भाग), गणेश चौक ते बनसोडे यांचे घर, धनराज सिमेंट वर्क ते सुरेश शेंडे यांचे घर बनसोड यांचे घर ते चांदेवार यांचे घर ते सुरेश शेंडे यांचे घर आणि भोजापुर ते खोकरला कालवा रस्ता ते गणेश चौक हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर बफर झोन केशव नगर परिसर ते खोकरला पेट्रोल पंप खात रोड रेल्वे क्रॉसिंग ते खोकरला गाव ते गणेश शाळेजवळील रेल्वे क्रॉसिंग ते तकिया चौक ते महामार्गाकडे जाणाऱ्या पूर्वेकडील भाग, सीताराम सिटी, महात्मा फुले कॉलनी ते बेला नाल्यापर्यंत आणि भोजापूर ते अंबिकानगर व संपूर्ण भोजापूर ग्रामपंचायत हद्दीचा समावेश आहे.

तिसरा कंटेंटमेंट झोन लाखणी तालुक्यातील जे.एम.सी. फ्लाय ओवर कंपनी यांचा कॅम्प हा कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 75 वर पोहोचली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.