ETV Bharat / state

मोहाडी तालुक्यातील खमारी येथे वीज पडून तीन लोकांचा जागीच मृत्यू - Bhandara latest news

वीज कोसळल्याने तीन शेत मजुरांचा मृत्यू झाला आहे तर शेत मालक व त्यांची मुलगी, असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मोहाडी तालुक्यातील खामारी (बुज) या गावात घडली आहे.

वीज
वीज
author img

By

Published : Jun 8, 2021, 7:11 PM IST

भंडारा - जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला. शेतात काम करणाऱ्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाले आहेत. ही घटना मोहाडी तालुक्यातील खामारी (बुज) गावात घडली आहे.

अनिता फातू सवालाखे (वय 45 वर्षे), आशा संपत दमाहे (वय 46 वर्षे), सहीक फीरतलाल उपराडे (वय 48 वर्षे), अशी मृतांची नावे आहेत. रतीलाल उपराडे व पलवी रातीराम उपरडे, अशी जखमींचे नावे आहे.

मशागतीची कामे होती सुरू

खमारी (बुज) गावात रतीलाल उपराडे यांच्या शेतात मशागतीचे काम सुरू होते. दिवसभर उनाचा कडाका होता. मात्र, दुपारी तीन वाजल्यानंतर अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पाऊस सुरू झाला. त्यानंतर सुरक्षित जागी जाण्याचा प्रयत्न करत असताना वीज कोसळली यात तिघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. शेतमालक रतीलाल उपरडे व त्यांनी मुलगी पल्लवी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळ धाव घेत पंचनामा केला.

हेही वाचा - अबब! चोराने चक्क पोलिसाची वर्दीच चोरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.