ETV Bharat / state

पालगावातील उमा प्लास्टिक कंपनीला भीषण आग; कच्चा माल जळून खाक - भंडारा लेटेस्ट न्यूज

आग नेमकी कशामुळे लागली ही सध्या सांगता येत नसले तरी कंपनीमध्ये उत्पादन घेण्यासाठी असलेली केमिकल बॅग ओली झाल्यास ती जाळायला सुरुवात होते आणि त्यातून ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीच्या मालकांनी व्यक्त केला आहे.

भीषण आग
भीषण आग
author img

By

Published : May 25, 2021, 1:22 PM IST

Updated : May 25, 2021, 1:54 PM IST

भंडारा - तालुक्यातील पालगाव येथे असलेल्या उमा प्लास्टीक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी सहा वाजेपासून ही आग लागली असून दुपारी बारापर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते. आगीमध्ये जवळपास 80 ते 1 करोड रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कंपनी मालकांनी व्यक्त केला आहे. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कंपनीमध्ये असलेल्या केमिकल बॅगमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पालगावातील उमा प्लास्टिक कंपनीला भीषण आग
4 अग्निशामक घटनास्थळी दाखलमंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान या कंपनी च्या आत मधून धूर निघत असल्याचा कंपनीत काम करणाऱ्या आणि कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीला लक्षात आले. त्यांनी याची माहिती भंडारा येथे राहणाऱ्या कंपनीच्या मालकांना दिली. कंपनीच्या मालकांनी लागेच भंडारा नगरपालिका, साकोली नगरपालिका, तुमसर नगरपालिका, सनफ्लॅग आणि आयुध निर्माण फॅक्टरीला आग लागल्याची माहिती दिली. मात्र, जोपर्यंत कंपनी मालक आणि अग्निशामक गाड्या घटनास्थळी पोहचली तोपर्यंत या आगीने भीषण रूप धारण केले होते. ही आग विझविण्यासाठी भंडारा नगरपालिकेच्या दोन अग्निशामक गाड्या, तुमसर नगरपालिकेची 1 गाडी, सनफ्लॅग कंपनीची एक गाडी आणि ऑडनन्स फॅक्टरीची एक गाडी अशा पाच गाड्यांच्या माध्यमातून ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरु होते.कंपनीच्या परिसरातील आग सतत धगधत होती

अग्निशामकच्या माध्यमातून कंपनीमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, कंपनीच्या परिसरात असलेला कच्च्या प्लास्टिक मालावर नियंत्रण मिळविणे अग्निशामक गाळ्यांना शक्य होत नव्हते. सकाळी सहा वाजता लागलेली आज दुपारी 12 नंतर विझविण्याचे काम सुरू होते. पुढेही दोन-तीन तास ही संपूर्ण आग विझवण्यासाठी लागेल असे कंपनीच्या मालकांनी सांगितले.

जवळपास 80 लाख ते एक करोडरुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

मागील दहा वर्षापासून ही कंपनी इथे प्लास्टिकच्या मालाला रिसायकलिंग करून प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या बारीक दाना तयार करते. आज लागलेल्या आगीमध्ये कच्चामाल जवळपास पूर्णपणे जळलेला असून तयार झालेला मालक ही बऱ्याच प्रमाणात जळलेला आहे. एकंदरीतच या आगीत 80 लाख ते 1 करोड रुपयांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनी मालकांनी व्यक्त केला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली ही सध्या सांगता येत नसले तरी कंपनीमध्ये उत्पादन घेण्यासाठी असलेली केमिकल बॅग ओली झाल्यास ती जाळायला सुरुवात होते आणि त्यातून ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीच्या मालकांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : May 25, 2021, 1:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.