ETV Bharat / state

भंडारा: सनफ्लॅग कंपनीच्या २,५०० कामगारांचा संप; तिढा सुटेना!

मागील अनेक महिन्यांपासून सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी आणि कामगारांमध्ये विविध मागण्यांसाठी चर्चा सुरू आहे. कामगारांना मागील वर्षी बोनस दिला गेला नाही. नियमित कामगारांच्या पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपुष्टात आला आहे.

author img

By

Published : Mar 13, 2021, 8:31 PM IST

Updated : Mar 13, 2021, 8:42 PM IST

sunflag irons workers
सनफ्लॅग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप

भंडारा - वरठी येथील सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनीतील जवळपास अडीच हजार मजुरांनी संपाचा हत्यार उगारला आहे. या कंपनीतील नियमित आणि कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन कंपनी प्रशासन चालढकल करीत असल्याने हे कामबंद आंदोलन केल्याचे कामगार नेत्यांनी सांगितले आहे. तर जोपर्यंत संप बंद होणार नाही, तोपर्यंत कामगारांशी चर्चेची कुठलीही वाटाघाटी होणार नसल्याचे कंपनी प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे कोट्यावधीची उलाढाल असलेली या कंपनीचे उत्पादन 13 मार्चपासून बंद झालेले आहे.

मागील अनेक महिन्यांपासून सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी आणि कामगारांमध्ये विविध मागण्यांसाठी चर्चा सुरू आहे. कामगारांना मागील वर्षी बोनस दिला गेला नाही. नियमित कामगारांच्या पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपुष्टात आला आहे. कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा होऊनही वर्ष लोटूनही त्यावर तोडगा निघाला नाही. 5 वर्षांपेक्षा अधिक कार्य करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पंचिंगचे अधिकार व करार करूनही दिले गेले. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांच्या बाबतीत कंपनी व्यवस्थापनाच्या ताठर भूमिकेमुळे कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करीत सनफ्लॅग आयर्न आणि स्टील मजदूर सभा आणि सनफ्लॅग कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने कंपनी व्यवस्थापनाला 13 मार्चपासून बेमुदत संप करणार असल्याची नोटीस दिली होती. पहिले 14 दिवस नोटीस देऊनही कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही भूमिका घेतली नाही. अडीच हजार कामगारांनी 13 मार्चला सकाळपासून या आंदोलनात सहभागी होत संप पुकारला आहे. मजदूर सभा युनियनच्या कार्यालयासमोर या कामगारांनी एकत्रित येत कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणाचा निषेध केला आहे.

सनफ्लॅग कंपनीच्या २,५०० कामगारांचा संप

हेही वाचा-मास्क व्यवस्थित घातला नाही तर प्रवाशांना विमानातून उतरवावे-डीजीसीआयचे आदेश

आमदारांची मध्यस्थी निष्फळ

कामगारांनी आंदोलन पुकारल्यानंतर क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर या कामगारांच्या शिष्टमंडळाला घेऊन सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चासुद्धा केली. मात्र, यामधून कुठलाही तोडगा निघाला नाही. हा प्रश्न आता कामगार मंत्र्यांकडे नेऊन शक्य तेवढ्या लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आमदारांनी यावेळी सांगितले.

sunflag irons workers strike
सनफ्लॅग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप

हेही वाचा-१ एप्रिल २०२२ नंतर १५ वर्षे जुनी सरकारी वाहने भंगारात निघणार

प्रकरण कामगार आयुक्तांच्या कार्यालयात...!

कंपनी प्रशासनाचे धोरण आणि कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन हे प्रकरण कामगार आयुक्तांच्या कार्यालयामध्ये पोहोचले आहे. आयुक्तांनी 24 तारखेला त्यावर सुनावणी ठेवलेली आहे. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समक्ष चर्चा होतात. त्यामुळे या चर्चेच्या माध्यमातून काहीतरी बाहेर येऊ शकणार आहे. एवढा मोठा कारखाना अचानक सोडून जाणे हे सर्वदृष्टीने धोक्याचे आहे. कोरोना काळ सुरू असल्याने कामगारांचे हे आंदोलन नियमबाह्य आहे. कामगारांनी संप मागे घेतल्याशिवाय यावर चर्चा होणार नाही. त्यामुळे यावर भाष्य करणार नसल्याचे या कंपनीच्या प्रबंधक श्रीवास्तव यांनी दिली आहे.

मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही-

हा संप म्हणजे आरपारची लढाई आहे. आमच्या मागण्यांना घेऊन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बरेचदा चर्चा झाली. मात्र, त्यांनी गांभीर्य दाखविले नसल्यानेच मागील वर्षभरापासून आमच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने नाईलाजाने हे संपाचे हत्यार उगारले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे मजदूर संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.

Last Updated : Mar 13, 2021, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.