भंडारा - केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय 2019-20 या शैक्षणिक वर्षात वर्ग 6 वीच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल संपूर्ण भारतात 14 दिवसांअगोदर जाहीर झाला आहे. मात्र भंडारा जिल्ह्याचे निकाल थांबवून ठेवले गेले आहेत. त्यामुळे 80 विद्यार्थांचे जवाहर नवोदय विद्यालयात शिकण्याचे स्वप्न अपूर्ण राहील, अशी भीती निर्माण झाली आहे. येत्या 8 दिवसात निकाल जाहीर न झाल्यास खासदारांच्या घरासमोर आंदोलन करू, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.
2017 पासून भंडारा जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाले आहे. सुरवातीला नवोदय विद्यालय हे अस्थायी इमारतीमध्ये सुरू करण्यात आले होते. पहिल्या वर्षी जकातदार शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये 80 ऐवजी 40 विद्यार्थांना प्रवेश मिळाला होता. त्यामुळे 40 विद्यार्थानाचे नुकसान झाले होते.
मात्र ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला होता. त्यामुळे विद्यार्थेाचे इतर जिल्ह्यात स्थलातर करण्यात येणार होते. मात्र पालकांनी आमरण उपोषण केल्यानंतर शासनाने जिल्ह्यातून विद्यार्थी हलविण्याचे निर्णय मागे घेतला होता.
त्यानंतर नवोदय विद्यालय हे अल्पसंख्याक वसतिगृहात नेण्यात आले. मात्र काही आठ दिवसातचं पुन्हा तिथून हलवून मोहाडी तालुक्यातील महिला विकास महामंडळाच्या अस्थाई इमारतीमध्ये नवोद्य विद्यालय सुरु करण्यात आले.
पाचगाव येथे बनत असलेली नवोदय विद्यालयाची इमारत या वर्षी पूर्ण होईल आणि तिथे 2019-20 पासून शिक्षण सुरू होईल, आशी अपेक्षा पालकांना होती. मात्र येथील इमारतीचे कार्य अजूनही निर्मनाधीन असल्याने अजूनतरी त्या ठिकाणी विद्यालय भरविणे शक्य नसल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या 7वी आणि 8वी मध्ये शिकणारे 80 मूले मुली आहेत. 6 वी साठी प्रवेश मिळविणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी क्लास रूम नाहीत, राहण्यासाठी व्यवस्था नाही, त्यामुळे या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे निकाल थांबविले गेले असल्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये प्रवेशपूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची चूक काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी 5000 विद्यार्थ्यानी प्रवेशपूर्व परीक्षा दिली होती. मात्र अजूनही या मुलांचे निकाल लागले नाहित. त्यामुळे नवोदय विद्यालयात शिकण्याचे स्वप्न अधुरेच राहते काय, अशी भीती विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांना सतावत आहे.
शासनाच्या या गोंधळामुळे पालकांनी यावर्षी ही मुलांसाठी आंदोलन करण्याचे ठरविले आहे. पालकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. येत्या 12 तारखेपर्यंत 80 विद्यार्थानाचे निकाल न लावल्यास नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू करू , अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली आहे.