ETV Bharat / state

राज्यस्तरीय नौकायन स्पर्धा : भंडाऱ्यात पहिल्यांदाच झाले आयोजन - state level canoeing and kayaking compitition bhandara

राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या जिल्ह्यातील मुलांना इतर खेळात वाव मिळत नाही. पश्‍चिम विदर्भात आणि दक्षिणोत्तर भारतात प्रचलित असलेला हा नौकायन खेळ भंडारा जिल्ह्यातही प्रसिद्ध होत आहे. मागील ३ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी वैनगंगा नदीवर नौकायनचे प्रशिक्षण घेत आहेत.

state level canoeing and kayaking compitition in bhandara
राज्यस्तरीय नौकायन स्पर्धा : भंडाऱ्यात पहिल्यांदाच झाले आयोजन
author img

By

Published : Jan 7, 2020, 7:58 AM IST

Updated : Jan 7, 2020, 8:07 AM IST

भंडारा - 14 व्या सीनियर महाराष्ट्र राज्यस्तरीय नौकायन स्पर्धेचे येथील वैनगंगा नदीवर आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 3 ते 6 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जवळपास 200 खेळाडूंनी यात सहभाग घेतला. ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीयस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

राज्यस्तरीय नौकायन स्पर्धा : भंडाऱ्यात पहिल्यांदाच झाले आयोजन

राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या जिल्ह्यातील मुलांना इतर खेळात वाव मिळत नाही. पश्‍चिम विदर्भात आणि दक्षिणोत्तर भारतात प्रचलित असलेला हा नौकायन खेळ भंडारा जिल्ह्यातही प्रसिद्ध होत आहे. मागील ३ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी वैनगंगा नदीवर नौकायनचे प्रशिक्षण घेत आहेत. गोसे धरणाच्या बॅक वॉटरमुळे वैनगंगा नदी बाराही महिने दुथडी भरून वाहते. याचाच फायदा जिल्ह्यातील खेळाडू घेत आहेत.

हेही वाचा - दाट धुके अन् ढगाळ वातावरणाने हरभऱ्याचे नुकसान... शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर!

जिल्ह्यातील खेळाडूंना कैनोइंग अँड कयाकिंग असोशिएशनमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात अनेक खेळाडूंनी या खेळात राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर भाग घेत पदक मिळविले आहे. तर या खेळाकरिता नदीची आवश्यकता असते. जिल्ह्यात वैनगंगा नदी असल्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने नौकायन स्पर्धेला अधिक वाव मिळत आहे. तर ज्याठिकाणी प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी स्प्रर्धेचे आयोजन झाले. यामुळे खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. तसेच अशा प्रकारचे खेळ होत राहिले तर विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल. आपल्या ग्रामीण भागातील मुले देखील देश पातळीवर खेळू शकतात. एवढेच नाही तर येणारा काळ खेळाडू ऑलिंपिकमधून पदकही मिळू शकतात, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला.

हेही वाचा - सत्तापिपासू भाजप आता रक्तपिपासू झालाय, बाळासाहेब थोरातांचा प्रहार

Intro:Anc: : - भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच" कनोइंग अँड कयाकिंग " म्हणजेच नौकायन स्पर्धेचे आयोजन केले गेले हे 14 वे सीनियर महाराष्ट्र राज्यस्तरीय कानोईंग आणि कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या दोनशे जवळ खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धकांपैकी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी चमूची निवड केल्या जाणार आहे अशा पद्धतीच्या आयोजनामुळे भंडारा जिल्ह्यातील खेळाडूंना ऑलम्पिक पदक सुद्धा मिळू शकते असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.
Body:
पश्‍चिम विदर्भात आणि दक्षिणोत्तर भारतात प्रचलित असलेला हा नाव काय आणि खेळ विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही प्रसिद्ध होत आहे भंडारा जिल्ह्याला लाभलेली वैनगंगा नदी असून मागील ३ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी येथे कनोइंग अँड कयाकिंगचे प्रशिक्षण घेत आहेत, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर बसलेला हा जिल्हा असून येथील मुलांना इतर खेळात वाव मिळत नाही म्ह्णून आता खेळाडू हे कनोइंग अँड कयाकिंग या खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत, गोसे धरणाच्या बॅक वॉटर मुळे वैनगंगा नदी बाराही महिने दुथडी भरून वाहते आणि याचा फायदा भंडारा जिल्ह्यातील एक खेळाडू घेत आहेत स्पर्धेच्या दृष्टिकोनातून अगदी योग्य असलेल्या या वैनगंगा नदीवर पहिल्यांदाच १४ वे सीनियर महाराष्ट्र राज्य स्तरीय नौकायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील जवळपास २०० विद्याथ्यांनी सहभाग घेतला आहे.
भंडारा जिल्ह्यातील खेळाडूंना कनोइंग अँड कयाकिंग असोशिएशन मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत असून अनेक खेळाडूने या खेळात राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर भाग घेत पदक मिळविले आहे , तर या खेळाकरिता नदीची आवश्य्कयात असल्यामुळे जिल्ह्यात वैनगंगा नदी असल्यामुळे या खेळाला जिल्ह्याच्या दृष्टीने अधिक वाव मिळत आहे, ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणि स्प्रर्धेचे आयोजन झाल्यामुळे खेळाळूनि आनंद व्यक्त केला असून अशा प्रकारचे खेळ होत राहिले तर विध्यार्थ्यांना सुद्धा आवळा निर्माण होत असून आपल्या ग्रामीण भागातील मुले देखील देश पातळीवर खेळू शकतात एवढेच नाही तर येणारा काळ खेळाडू ऑलिंपिक मधून पद्धतही मिळू शकतात असा विश्वास प्रशिक्षकांनी दाखविला आहे

BYTE - अविनाश निंबार्ते, विद्यार्थी
BYTE - ख़ुशी डोये, विध्यार्थीनी
BYTE - राजेंद्र भांडारकर, सेक्रेटरी कनोइंग अँड कयाकिंग भंडाराConclusion:
Last Updated : Jan 7, 2020, 8:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.