भंडारा - महाराष्ट्र शासनाने कोरोनासाठी विशेष रुग्णालय घोषित केले होते. या 30 पैकी एक विशेष रुग्णालय भंडाऱ्यामध्ये तयार करण्यात आले आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात ही इमारत कोरोनासंबधित रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. रविवारी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय यांनी या नवीन रुग्णालयाची पाहणी केली.
कोरोनासोबतच्या लढाईसाठी भंडारा तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा एकही रुग्ण अजून तरी भंडारा जिल्ह्यात आढळला नाही. मात्र, भविष्यातील विचार करून सतत उपाययोजना सुरू आहेत. एक दिवसापूर्वीच रुग्णालयात मॉक ड्रिल करून कोणकोणत्या उणिवा आहेत त्या पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
या रुग्णालयात 100 रुग्णांची व्यवस्था केली जाऊ शकते. सध्या इथे 43 अत्याधुनिक पद्धतीच्या बेडचे ICU कक्ष बनविले गेले आहे. यासाठी लागणारे ऑक्सिजन पाईप बसविण्यात आले आहेत. तसेच सध्या 8 व्हेंटिलेटर इथे बसविण्यात आले असून अजून 17 व्हेंटिलेटरची मागणी शासनाकडे केली गेली आहे.
याबरोबर 24 वगळले कक्ष ही आहेत. ज्यामध्ये रुग्णांना ठेवले जाणार आहे. तसेच डॉक्टर आणि परिचरिकरांसाठी ppt किट ही उपलब्ध असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. एकंदरीत भंडारा जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, असे असले तरी लोकांनी आपली काळजी घ्यावी आणि जिल्ह्यात आज जशी परिस्थिती आहे, तशीच राहावी अशी अपेक्षा आरोग्य विभाग, प्रशासकीय विभाग आणि नागरिक करीत आहेत. सध्या भंडाऱ्यामध्ये 10 लोकांना आयसोलेशन कक्षामध्ये ठेवण्यात आले असून काही लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर, काहींचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तसेच मरकझशी अप्रत्येक्षपणे संबंध असलेल्या 11 लोकांना नर्सिंग क्वारंटाईन ठेवले असून यांचे अहवाल अप्राप्त आहेत.