भंडारा - सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची इच्छा नसतानाही पाल्यांना मोबाईल, टॅबलेट द्यावा लागत आहे. या मोबाईलच्या उपयोगामुळे मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही काळजी घेतल्यास पालक आपल्या मुलांचे डोळ खराब होण्यापासून नक्कीच वाचवू शकतील. याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
२०-२० फार्म्युला -
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, या कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बऱ्याच शाळेने ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. यामध्ये काही शाळा ऑनलाइन शिकवितात, तर काही शाळा अर्ध्या तासांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाठवतात. ते पाहून विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण करायचा असतो. यामुळे विद्यार्थ्यांचा अधिक वेळ स्क्रीनवर जात आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणजे डोके दुखणे, डोळ्यांना जळजळ होणे, अशी त्रास सुरू झाले आहेत. काही मुलांना चष्मा सुद्धा लागला आहे. हे सर्व टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी 20 मिनिटांनी मोबाईल बाजूला करून 20 सेंकंदासाठी 20 फूट लांब पाहावे. खोलीत बसले असाल तर 20 सेकंद डोळे बंद करावे. त्यानंतर 20 वेळा डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करावी. ही प्रक्रिया दर 20 मिनिटांनी करावी. यामुळे डोळ्यावरील ताण कमी होण्यास मदत मिळले आणि डोळ्यातील लुब्रिकन्ट्स कायम राहील, असे नेत्रतज्ज्ञ सिद्धार्थ चौहान यांनी सांगितले.
इतर चांगल्या सवयी प्रमाणे ही सवय सुद्धा मुलांना लावावी. ज्यांचे डोळे कोरडे पडत असतील अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कृत्रिम लुब्रिकन्ट्स डोळ्यात घालावे. तसेच लहान मुलांना वाचण्यात किंवा पाहण्यात थोडीशी ही अडचण असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डोळे तपासून घ्यावे आणि 0.5 नंबर चा चष्मा लागत असल्यास तो लावावा. त्यासाठी अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ग्लास वापरल्यास मोबाईलमधून निघणाऱ्या किरणांचा डोळ्यावर प्रभाव होत नाही, असेही डॉ. चौहान म्हणाले.