ETV Bharat / state

'कोरोना' इफेक्ट : भंडारा जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत सर्व व्यवसाय बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी 15 मार्चपासून शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, बार, रस्त्यावरील टपर्‍या यांच्यावर 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहेच. त्यात आता 20 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एक आदेश काढला असून या आदेशानुसार जीवनावश्यक आणि सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, दुकाने, कारखाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

shut down in bhandara
कोरोनामुळे भंडाऱ्यात बंद
author img

By

Published : Mar 21, 2020, 4:31 PM IST

भंडारा - देशात कोरोना विषाणूचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी 15 मार्चपासून शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, बार, रस्त्यावरील टपर्‍या यांच्यावर 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहेच. त्यात आता 20 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एक आदेश काढला असून या आदेशानुसार जीवनावश्यक आणि सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, दुकाने, कारखाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

भंडारा जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत सर्व व्यवसाय बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हेही वाचा... मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आजपासून सक्तीची बंदी; रस्त्यांवर शुकशुकाट

21 मार्चपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ज्या लोकांना आदेश प्राप्त झाला त्यांनी त्यांचे दुकाने बंद ठेवली आहेत. तर उर्वरित दुकानदारांनी त्यांचे दुकान सुरू केले असता पोलिसांनी सर्व दुकाने बंद केली. फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवेत मोडणाऱ्या औषधे, भाजीपाला, किराणा आणि दूध यांची दुकाने उघडी ठेवण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू केल्यामुळे चारपेक्षा जास्त लोक एकत्रित जमा झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरू असलेली काळीपिवळी प्रवासी वाहतूकसुद्धा 31 मार्चपर्यंत बंद केली आहे. तर रिक्षा अथवा इतर वाहनात दोनपेक्षा जास्त प्रवासी एकावेळी नेता येणार नाहीत.

आजपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहेत. ज्या नागरिकांना शासकीय कामे असतील त्यांनी त्या कार्यालयाच्या व्हॉट्सअॅपवर माहिती द्यावी. संबंधित माहितीच्या आधारे अधिकारी आणि कर्मचारी ते काम करण्यासाठी तुम्हाला बोलावून घेतील किंवा ई-मेल द्वारे त्या कामाची माहिती. भंडारा जिल्ह्यासाठी सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत 14 नागरिक विदेशातून आले असले तरी यापैकी एकही संशयित रुग्ण नाही. 14 पैकी 9 लोकांना आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात ठेवले असून, उर्वरित पाच लोकांना होम क्वारंटाईन केले आहे.

हेही वाचा.... कोरोना विशेष: भारत तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर.. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती

कोरोना विषाणूचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या निर्णयाची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काटेकोर अंमलबजावणी करायला हवी. मात्र, 21 तारखेला बऱ्याच लोकांनी सुरुवातीला दुकाने सुरू ठेवली. मात्र, पोलिसांनी सांगितल्यानंतर बंद केल्यावर जमावबंदी असूनही नागरिकांनी दुकानासमोर किंवा इतर ठिकाणी गर्दी केली होती. शेवटी पोलिसांनी त्या सर्वांना घरी जाण्यास सांगितले तसेच विनाकारण वाहतूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करून पुन्हा काम नसल्यास बाहेर निघू नका, असेही बजावण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.