ETV Bharat / state

गुरूंवर अन्याय करणारे सर्वसामान्यांना कसा न्याय देतील - शरद पवार - राजीव गांधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या निवडणूक प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आज भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे पार पडली. या सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार प्रहार केला.

भंडारा जिल्ह्यात प्रचार सभेत बोलताना शरद पवार
author img

By

Published : Apr 8, 2019, 11:18 PM IST

Updated : Apr 8, 2019, 11:56 PM IST

भंडारा - ज्या भारतीय जनता पार्टीला लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांनी लहानाचे मोठे केले. त्याच गुरुवर्य लोकांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी अडगळीत टाकून त्यांच्यावर अन्याय केला. ज्या पक्षामध्ये स्वतःच्या गुरुवर अन्याय होतो, त्या पक्षाकडून सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल, असा सवाल शरद पवार यांनी केला. ते साकोली येथील जाहीर सभेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या निवडणूक प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आज भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे पार पडली. या सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार प्रहार केला.

नरेंद्र मोदी विदर्भात आल्यानंतर आपण मागच्या पाच वर्षात काय केले हे सांगण्यापेक्षा पवार कुटुंब आणि गांधी कुटुंब यांच्यावर भाष्य केले. काँग्रेसने आजपर्यंत काय केले असा प्रश्न ते विचारत होते. त्यांना मी सांगू इच्छितो, की देशामध्ये जी वैज्ञानिक क्रांती घडून आली त्याचे संपूर्ण श्रेय हे राजीव गांधी यांना जाते. त्यांच्यामुळेच देशामध्ये कॉप्युटर, मोबाईल अशा आधुनिक गोष्टी आल्या आहेत. काँग्रेसच्या काळातच पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. काँग्रेसच्या काळामध्ये भंडारा-गोंदियातून तांदूळ हा संपूर्ण देशात निर्यात केला गेला. त्यामुळे हिंदुस्तान तांदूळ निर्यातीमध्ये देशात अव्वल ठरला होता.

इंदिरा गांधींनी भुगोल घडवला -
इंदिरा गांधी या देशाचे सक्षम नेतृत्व होते. इतिहास बऱ्याच लोकांनी घडवला. मात्र, इंदिरा गांधी यांनी भूगोल बनवला. पाकिस्तानात जाऊन त्यांचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती करून एक वेगळा भूगोल इंदिरा गांधींनी बनवला, असे धाडशी नेतृत्व हे काँग्रेसमध्ये होते. तरीही नरेंद्र मोदी विचारतात की काँग्रेसने काय केले. असे गौरव उद्धार इंदिरा गांधी यांच्या विषयी बोलताना शरद पवार यांनी काढले.

नोटबंदीवर केले भाष्य -
नोटबंदीनंतर काळे धन परत येईल आणि दहशतवाद्यांना मिळणारा पैसा बंद होईल, त्यामुळे दहशतवादी कारवाया बंद होतील. असे मोदींनी सांगितले होते. मात्र त्यानंतरही पुलमावासारखा हल्ला होत असेल तर त्यांचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी देशाला द्यायला हवे. नोटबंदीनंतर एकट्या महाराष्ट्रात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जवळपास १५ लाख लोकांचे रोजगार गेले. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे पाप या सरकारने केले, असा आरोप पवार यांनी केला.

सैनिकांवर राजकारण नको -
अभिनंदन परत आल्यानंतर त्याच्या घरच्यांनी यात राजकारण करू नका, असे सांगितले होते. मात्र, तरीही भाजप सरकारने त्याचे राजकारण करत स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही किती धाडसी काम केले हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अभिनंदनला तुम्ही परत आणलेत तर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकार का सोडु शकले नाही? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पाकिस्तान को 'लव लेटर' लिखना बंद करो असे बोलले होते. मात्र, ते पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास ७०० हल्ले मागील ५ वर्षात झाले आहेत. त्याचेही उत्तर त्यांनी देशाला द्यायला हवे, असेही पवार यांनी म्हटले.

Intro:Anc : भारतीय जनता पक्षाला लहानाचे मोठे करण्याचे काम ज्या गुरुंनी केलं त्यांना अडगळीत टाकून त्यांच्यावर अन्याय करणारे मोदी आणि भाजपा सरकार हे सर्वसामान्य लोकांना कसा न्याय देऊ शकतील अशी टीका शरद पवार यांनी साकोली येथील जाहीर सभेत केली.

Body:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या निवडणूक प्रचारासाठी शरद पवार आज भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात जाहीर सभेसाठी आले होते त्यावेळेस त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्यावर जोरदार प्रहार केला.

या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी बीजेपी शासन हे अन्याय करणारे शासन असल्याचे सांगत मोदी आणि भाजपा त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला.
ज्या भारतीय जनता पार्टीला लाल कृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांनी लहानाचे मोठे केले त्याच गुरुवर्य लोकांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अडगळीत टाकून त्यांच्यावर अन्याय केला या पक्षामध्ये स्वतःच्या गुरुवर चांगल्या होतो त्या पक्षाकडून सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल असा प्रश्न यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी विदर्भात आल्यानंतर आपण मागच्या पाच वर्षात काय केलं हे सांगण्यापेक्षा पवार कुटुंब आणि गांधी कुटुंब यांच्यावर भाष्य करीत होते काँग्रेसने आजपर्यंत काय केले असा प्रश्न ते विचारत होते त्यांना सांगू इच्छितो की देशामध्ये जी वैज्ञानिक क्रांती घडून आली त्याचं संपूर्ण श्रेय हे राजीव गांधी यांना जाते त्यांच्यामुळेच देशामध्ये कंप्यूटर मोबाईल अशा आधुनिक गोष्टी आल्यात काँग्रेसच्या काळातच पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आणि काँग्रेसच्या काळामध्ये भंडारा-गोंदिया तांदूळ हा संपूर्ण देशात निर्यात केला गेला त्यामुळे हिंदुस्तान तांदूळ निर्यातीमध्ये देशात अव्वल ठरला होता.

इंदिरा गांधी यांच्या विषयी बोलताना शरद पवारांनी सांगितले इंद्रागांधी सक्षम नेतृत्व होते इतिहास बऱ्याच लोकांनी बनविला मात्र इंदिरा गांधी यांनी भूगोल बनविला कारण पाकिस्तानात जाऊन त्यांचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती करून एक वेगळा भूगोल बनविला असे धाडशी नेतृत्व हे काँग्रेसमध्ये होते तरीही नरेंद्र मोदी विचारतात की काँग्रेसने काय केलं.

नोटबंदी नंतर एकट्या महाराष्ट्रात 100 लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास पंधरा लाख लोकां चे रोजगार गेले नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्थाही उध्वस्त करण्याचे पाप या सरकारने केले नोटबंदीनंतर काळे धन परत येईल आणि आतंकवाद्यांना मिळणारा पैसा बंद होईल त्यामुळे आतंकवादी कारवाया बंद होतील आता मोदींनी सांगितलं होतं मात्र त्यानंतरही पुलमावा सारखा हल्ला होत असेल तर त्याचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी देशाला द्यायला हवा.

अभिनंदन परत आल्यानंतर त्याच्या घरच्यांनी यात राजकारण करू नका असं सांगितलं होतं मात्र तरीही बीजेपी शासनाने त्याचा राजकारण करत स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही किती धाडसी काम केले हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी लोकांना केला तर अभिनंदन ला तुम्ही परत आणलेत तर कुलभूषण जाधव यांना का सरकार सोडु शकले नाही असा प्रश्न यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पाकिस्तान को लव लेटर लिखना बंद करो असे बोलले होते मात्र ते पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास 700 हल्ले मागील पाच वर्षे झाले आहेत त्याचेही उत्तर त्यांनी देशाला द्यायला हवा असे मोदी यांना उद्देशून म्हंटल.
सरतेशेवटी देश्यात सर्वसामान्य लोकणाचे राज्य यायला हवे असल्यास नाना पंचबुद्धे यांना निवडून द्या आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, त्यामुळे येणाऱ्या काळात गोसे, भेल सारखे प्रकल्प नक्कीच मार्गी लागतील.

Conclusion:
Last Updated : Apr 8, 2019, 11:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.