ETV Bharat / state

भंडाऱ्यात आषाढी एकादशीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्माईची दिंडी यात्रा काढली.

author img

By

Published : Jul 12, 2019, 6:38 PM IST

नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी काढलेली दिंडी यात्रा

भंडारा - आषाढी एकादशीनिमित्त आज नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्माईची दिंडी यात्रा काढली. यावेळी विठू माऊलीच्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमले.

नूतन कन्या शाळेमधून ढोल ताशाच्या गजरात लेझीम खेळत विद्यार्थ्यांनी विठू माऊलीची पालखी घेऊन दिंडी यात्रा काढली. या दिंडी यात्रेमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी हजेरी लावली होती. या यात्रेचे आकर्षण म्हणजे विठ्ठल रुक्माई आणि ज्ञानेश्वरांच्या वेशातील विद्यार्थिनी होत्या.

नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी काढलेली दिंडी यात्रा

शाळेतून निघालेली ही दिंडी शहराच्या विविध भागातून गांधी चौकात प्रदक्षिणा घालत विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन पोहोचली. यावेळी वाटेत भाविकांनी पालखीचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. मंदिरामध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षकांनीही विठ्ठलाचे दर्शन घेऊन पूजा केली. विद्यार्थिनींना दिंडीच्या माध्यमातून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन व्हावे, यासाठी दरवर्षी नूतन कन्या शाळेतून दिंडी यात्रा काढली जाते, अशी माहिती शाळा प्रशासनाने दिली.

Intro:Anc : आषाढी एकादशीनिमित्त आज नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्माई ची दिंडी यात्रा काढली. या बेली विठू माऊली च्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमले होते या दिंडीतील विठ्ठल रुक्माई च्या वेशातील विद्यार्थिनी जणू साक्षात पृथ्वीवर देव अवतार की काय असे वाटत होते.

Body:सकाळी नूतन कन्या शाळेमधून दिंडी आता निघाली ढोल ताशाच्या गजरात लेझीम खेळत विद्यार्थ्यांनी विठू माऊलीची पालखी घेऊन दिंडी यात्रा काढली, या दिंडी यात्रेमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी हजेरी लावली होती या यात्रेचे आकर्षण म्हणजे विठ्ठल रुक्माई आणि ज्ञानेश्वरांच्या विषयातील विद्यार्थिनी होत्या. शाळेतून निघून शहराच्या विविध भागातून गांधी चौकात प्रदिक्षणा घालत ही दिंडी यात्रा विठ्ठल रुक्माई च्या मंदिरात जाऊन पोहोचली वाटेत भाविकांनी पालखीचे दर्शन घेत पूजा-अर्चना केली.
मंदिरामध्ये विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली या दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थिनींना दिंडीच्या मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने दरवर्षी नूतन कन्या शाळेतून दिंडी यात्रा काढली जाते यात्रेमध्ये विद्यार्थिनीही नटून-थटून भाग घेतात. वारीत न जाऊ शकलेल्या भाविकांना या दिंडी यात्रेच्या माध्यमातून वारीत गेल्याचे आणि विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचे अनुभव मिळते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.