भंडारा - 'सरपंच सेवा महासंघ'च्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचांनी साखळी उपोषण केले आहे. राज्य शासनाने सरपंचांचे अधिकार कमी केल्याच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सरपंचांनी हे उपोषण केले आहे, यात महिला सरपंचांचाही समावेश होता.
हेही वाचा... भंडाऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी नियमांचे तिनतेरा
राज्य सरकार सरपंचाच्या अधिकारात सतत कपात करीत असून या अधिकार कपातीमुळे सरपंच नामधारी बनत चालेला आहे, असा आरोप करत, स्थानिक स्वराज्य संस्थेला यामुळे तडा जात आहे, असे सरपंचांचे म्हणने आहे. त्यामुळे सरकारने सरपंचांच्या अधिकारात वाढ करत, त्यांचे दाखले देण्याचे अधिकार पूर्ववत करावे. या मुख्य मागणीसह अन्य काही मागण्यांना घेऊन भंडाऱ्यातील विविध गावातील सरपंचांनी उपोषण केले आहे.
हेही वाचा... दारू तस्करी प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त
काय आहे नेमके कारण ?
नव्या शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायतीला रहिवासी दाखला देण्याचे अधिकार राहिले नाहित. यामुळे गावकाऱ्यांकडून कर वसूल करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायतीचे महसूल यामुळे घटत आहे. त्यामुळे विकासासाठी मारक ठरत असलेला निर्णय रद्द करावा आणि आमचे अधिकार आम्हाला पूर्ववत द्यावे, अशी सरपंचांची मागणी आहे.
हेही वाचा... तुम्हाला कशी 'झक' मारायचीय ती मारा, शरद पवारांचा तोल सुटला