ETV Bharat / state

शासकीय अधिकार द्या; 3 महिन्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ - संजय कूटे - nana patole

ओबीसीचे राजकीय आरक्षण वाचवायचे असल्यास त्यांनी आम्हाला केवळ शासकीय अधिकार द्यावेत. या खात्याचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे केवळ 3 महिन्यात आम्ही ओबीसीला राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण
ओबीसीचे राजकीय आरक्षण
author img

By

Published : Jun 23, 2021, 6:57 AM IST

Updated : Jun 23, 2021, 7:19 AM IST

भंडारा - शासकीय अधिकार द्या 3 महिन्यात राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ, असे खळबळजनक वक्तव्य भाजपा नेते आणि ओबीसी खात्याचे माजी कॅबिनेट मंत्री संजय कुटे यांनी केले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते मंगळवारी भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ - संजय कूटे
पटोले आणि वडेट्टीवार यांनी सत्तेची लाचारी सोडावी-ओबीसीचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेल्याचे आरोप करत कुटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. "तुमचे सत्तेत कोणीही ऐकत नाही" तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर लाचारी न पत्करता सत्तेतून बाहेर पडा असे आवाहन त्यांना केले आहे. आम्हाला फक्त 3 महिन्याचे अधिकार द्या-जर ओबीसी नेते म्हणणारे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना सत्तेची लालसा पद सोडण्यासाठी आडवी येत असेल, तर त्यांनी खुशाल सत्तेत राहावे. मात्र ओबीसीचे राजकीय आरक्षण वाचवायचे असल्यास त्यांनी आम्हाला केवळ शासकीय अधिकार द्यावेत. या खात्याचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे केवळ 3 महिन्यात आम्ही ओबीसीला राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे. 26 जूनला रास्ता रोको आंदोलन-महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे गेलेला आरक्षण परत मिळावा यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढणार आहोत. तसेच 26 जून ला भाजपा द्वारे ओबीसी च्या प्रश्नासाठी संपूर्ण राज्यात रास्तारोखो आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 23, 2021, 7:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.