भंडारा- जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या जळीत अग्निकांडातील पिडीत कुटुंबियांची महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या मातांची नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भंडारा अग्नितांडव दुर्घटना; पीडित मातांचे मानसरोग तज्ञांकडून समुपदेन- यशोमती ठाकूर मातांची नियमित आरोग्य तपासणी करा-एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा मालो यांनी भंडारा येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सदर मातांची अंगणवाडी सेविका, आशा व एएनएम यांच्याकडून नियमित आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिले. घटनेतील मृत बालके संबंधित रुग्णालयात का दाखल करण्यात आली होती, याबाबतचाही अहवाल तात्काळ आयुक्तालयास पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच मृत बालकांच्या मातांचे नियमित समुपदेशन करुन त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या. मातांची घरपोच आरोग्य तपासणी डॉक्टरांनी करावी व दैनंदिन अहवाल आशामार्फत कळवावा. यासाठी स्वयंसेवी संस्थांची सुध्दा मदत घेण्याची सूचना त्यांनी दिली.
भंडारा अग्नितांडव दुर्घटना; पीडित मातांचे मानसरोग तज्ञांकडून समुपदेन- यशोमती ठाकूर पीडित कुटुंबांचे सांत्वन-जळीत प्रकरणातील मृत बालकांच्या माता योगिता विकेश धुळसे (श्रीनगर) व रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम यांची भेट घेत सांत्वन केले. तसेच मातांच्या आरोग्याविषयी कोणतीही हयगय न करता त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या