ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय विदारक, मात्र लॉकडाऊन नको - खासदार सुनील मेंढे - खासदार सुनील मुंढे बातमी

जिल्ह्यातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयातील आयसीयू वॉर्ड हे संपूर्ण भरले आहे. त्यातच मागील आठवडाभरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, भंडारा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय विदारक असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.

खासदार सुनील मेंढे
खासदार सुनील मेंढे
author img

By

Published : Apr 5, 2021, 2:35 PM IST

भंडारा - जिल्ह्यातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयातील आयसीयू वॉर्ड हे संपूर्ण भरले आहे. त्यातच मागील आठवडाभरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, भंडारा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय विदारक असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन न करता निर्बंध अधिक कडक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भंडारा जिल्हयतील परिस्थिती विदारक
खाजगी रुग्णालय भरलेले...

मागील आठवडाभरापासून भंडारा जिल्ह्यात दर दिवशी पाचशेच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील खाजगी कोरोना रुग्णालयातील बेड जवळपास भरले आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण 12 खाजगी कोरोना रुग्णालय आहेत. या बारा रुग्णालयांत 301 बेड आहेत. त्यापैकी 256 बेड भरले असून पाच दवाखान्यातील 45 बेड रिकामे आहेत. खाजगी रुग्णालयात रेमेडीसीवर या इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे.

शासकीय रुग्णालयातील आयसीयूही भरलेले
भंडारा जिल्ह्यात सात तालुके मिळून 14 ठिकाणी शासकीय कोरोना वार्ड तयार करण्यात आले असून त्यात 766 बेड आहेत. यापैकी 207 बेड भरलेले असून 559 रिकामे आहेत. सीसीसी उपचारानंतर परिस्थिती नियंत्रणात असलेल्या रुग्णांसाठी हे बेड राखीव आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी 159 बेड आहेत. तर आयसीयूचे 50 बेड आहेत. यापैकी केवळ चार बेड रिकामे आहेत.

परिस्थिती हाताबाहेर
विदर्भातील भंडारा जिल्हात नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मागील आठ दिवसांपासून दररोज पाचशेच्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. खाजगी रुग्णालय भरले असून शासकीय रुग्णालयातील आयसीयू पूर्ण भरले आहे. जिल्ह्यातील भयाण झालेल्या परिस्थितीवर शासनाने नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक निर्बंध लावणे गरजेचे आहे. नागरिकांनीही स्वतःच्या जबाबदाऱ्या समजून घेऊन कोरोना नियमांचे पालन करावे अशी विनंती खासदार सुनील मेंढे यांनी नागरिकांना केली आहे.

लॉकडाऊन नको
परिस्थिती हाताबाहेर चालली असून, नागरिकांना विनंती करूनही ते ऐकत नाही. त्यामुळे लॉकडाऊनऐवजी नागरिकांवर शक्य तेवढे कडक निर्बंध लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणाच्या मोहिमेतही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि 45 वर्षांच्या वरील सर्वच पात्र व्यक्तींनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. तरच येत्या काळात आपल्याला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल, असेही खासदार मेंढे यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारीही 844 कोरोनाबाधित रुग्ण
शनिवारी भंडारा जिल्ह्यात 846 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. रविवारी जवळपास 844 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 243 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात आज एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 861 एवढी झाली आहे. तसेच 4979 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या पंधरा हजार 530 एवढी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.