ETV Bharat / state

पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी; आरोपीला घेऊन गेले वडिलांच्या अंत्यविधीला - culture

आठवड्याभरापूर्वीच एका हत्येच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला पोलीस विभागाने संरक्षण देत वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची आणि हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सगळ्या विधी पूर्ण करण्याची मुभा दिली.

अंत्यविधी
author img

By

Published : Aug 14, 2019, 11:54 PM IST

भंडारा - आठवड्याभरापूर्वीच एका हत्येच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला पोलीस विभागाने संरक्षण देत वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची आणि हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सगळ्या विधी पूर्ण करण्याची मुभा दिली. पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीची गावात चर्चा होत आहे.

पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

बेला गावातील एका सराईत गुन्हेगाराची ८ दिवसाआधी त्याच गावातील लोकांनी हत्या केली होती. या हत्येच्या आरोपाखाली ६ लोकांना अटक करण्यात आली होती. या आरोपींपैकी एक बंटी नावाच्या मुलाच्या वडिलांचा बुधवारी मृत्यू झाला होता. मृत्यूची बातमी बंटीपर्यंत पोचतात वडिलांचे अंतिम दर्शन घेऊन अंत्यविधी करण्याची मुभा द्यावी अशी विनंती बंटीने केली. त्याच्या नातेवाईकांनीसुध्दा तसा विनंती अर्ज केला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विचार करत पोलिसांनी सुरुवातीला परवानगी दिली नाही. मात्र, बंटीला वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी घेऊन न गेल्यास एका मुलाला त्याच्या हक्कापासून दूर ठेवले जाईल. हा विचार खाकी वर्दीतील अधिकार्‍यांच्या डोक्यात येताच त्यांनी तातडीने न्यायालयाची परवानगी घेत सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता केली. नंतर पोलीस बंदोबस्तात बंटीला त्याच्या गावात नेवून हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधीचे सर्व सोपस्कार पूर्ण होईपर्यंत बंटीला सुरक्षा प्रदान केली.

वडिलांना अग्नी देताना पोलिसांनी बंटीच्या हातातील बेड्या सोडल्या होत्या, अंत्याविधीनंतर पोलिसांनी आणखी एकदा माणुसकीचा परिचय देत अंत्यविधीनंतर बंटीच्या बहिणीला बंटीला राखी बांधू दिले. बहुतके कोणत्याही बहिणीला आपल्या भावाला अशा पद्धतीने राखी बांधणे आवडणार नाही. मात्र, जर तो पोलीस कोठडीत असता तर तिला भावाला राखी बांधता आली नसती, म्हणून तिच्यासाठी राखी बांधण्याचा हा प्रसंग मोठा भावनिक होता. यावेळी खाकी वर्दीच्या या वेगळ्या रूपाची चर्चा संपूर्ण गावात रंगली होती.

आरोपी आज जरी अपराधी म्हणून आमच्या कैदेत असला तरी त्याने सदैव अपराधी राहू नये असा आमचा सदैव प्रयत्न असतो. वडिलांच्या अंत्यविधीला जाऊ शकलो नाही हे शल्य आयुष्यभर त्याच्याशी चिकटून राहू नये, म्हणून आम्ही त्याला त्याचे कर्तव्य पूर्ण करण्याची संधी देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला असे पोलिसांनी सांगितले.

Intro:Body:Anc : आठ दिवसा पहिलेच एका हत्येच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला पोलीस विभागाणे संरक्षण देत वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची आणि हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सगळ्या विधी पूर्ण करण्याची मुभा दिली. पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीची गावात चांगली चर्चा आहे.
बेला गावातील एका सराईत गुन्हेगारांची आठ दिवसा पहिले त्याच गावातील लोकांनी हत्या केली होती. या हत्येच्या आरोपाखाली सहा लोकांना अटक करण्यात आली होती या आरोपींपैकी एक बंटी नावाच्या मुलाच्या वडिलांचा आज मृत्यू झाला होता, मृत्यूची खबर बंटी पर्यंत पोचतात वडिलांचे अंतिम दर्शन घेऊन अंत्यविधी करण्याची मुभा द्यावी अशी विनंती बंटीने केली, त्याच्या नातेवाईकाणे सुध्दा तसा विनंती अर्ज केला होता, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विचार करत पोलिसांनी सुरुवातीला परवानगी दिली नाही, मात्र बंटीला वडिलांचे अंतिम दर्शनासाठी घेऊन न गेल्यास एका मुलाला त्याच्या हक्कापासून दूर ठेवल्या जाईल हा विचार खाकी वर्दीतील अधिकार्‍यांच्या डोक्यात येताच त्यांनी तातडीने न्यायालयाची परवांगी घेत सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करून पोलीस बंदोबस्तात बंटीला त्याच्या गावात आणले आणि हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधीचे सर्व सोपस्कार पूर्ण होत पर्यंत बंटीला सुरक्षा प्रदान केली. वडिलांना अग्नी देताना पोलिसांनी बंटीच्या हातातील बेळ्या सोडल्या होत्या, अंतविधी नंतर पोलिसांनी अजून एकदा माणुसकी चे परिचय देत अंतविधी नंतर बंटीच्या बहिणीला बंटीला राखी बांधू दिले, बहुतके कोणत्याही बहिणीला आपल्या भावाला अश्या पद्धतीने राखी बांधणे आवडणार नाही, मात्र जर तो पोलीस कोठडीत असता तर तिला आपल्या भावाला राखी बांधता आली नसती म्हणून तिच्या साठी राखी बांधण्याचा हा प्रसंग मोठा भावनिक होता. खाकी गर्दीच्या या वेगळ्या रूपाची चर्चा संपूर्ण गावात रंगली होती.
आरोपी आज जरी अपराधी म्हणून आमच्या कैदेत असेला तरी त्याने सदैव अपराधी राहू नये असा आमचा सदैव प्रयत्न असतो. वडिलांच्या अंत्यविधीला जाऊ शकलो नाही हे शल्य आयुष्यभर त्याच्याशी चिकटून राहू नये म्हणून आम्ही त्याला त्याचे कर्तव्य पूर्ण करण्याची संधी देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
बाईट : चौहान, पोलीस निरीक्षक, भंडाराConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.